‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संवर्धन आराखड्यां’तर्गत ४ मंदिरांतील मूर्तींची आज प्राणप्रतिष्ठा !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता मंदिर जतन अन् संवर्धन विकास आराखड्यांतर्गत जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या श्री मारुति मंदिर येथील पूर्वीचे आणि आताचे छायाचित्र
श्री व्यंकटेश मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर येथील पूर्वीचे आणि आताचे छायाचित्र

  पंढरपूर – ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता मंदिर जतन अन् संवर्धन विकास आराखड्यां’तर्गत जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या श्री व्यंकटेश मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री काशी अन्नपूर्णा मंदिर, तसेच श्री मारुति मंदिर येथील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा ५ जुलै या दिवशी विधीवत् पार पडणार आहे. याविषयीची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र शेळके यांनी दिली. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिरांचे जीर्णोद्धार आणि संवर्धन करण्यात आले असून मंदिरांचा ऐतिहासिक वारसा जपत त्यांचे मूळ स्वरूप पुनर्स्थापित करण्यात आले आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर ही सर्व मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात येणार आहेत.