
महाबळेश्वर (सातारा) – महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावात ४ जुलैच्या सकाळी झालेल्या अतीवृष्टीमुळे गावाच्या वरच्या बाजूची काही भूमी (भाग) खचून झाडांसह मातीचा मोठा ढीगारा रस्त्यावर वाहून आला. घटनेनंतर प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ढिगारा हटवण्याचे काम चालू केले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तहसीलदार सचिन म्हस्के यांनी केले आहे.
४ घरांपैकी एक घर आधीपासूनच बंद असून उर्वरित ३ घरांतील नागरिकांना सुरक्षिततेच्या कारणास्तव सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. प्रशासनाकडून सध्या गावाला कोणताही तातडीचा धोका नाही. केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
केंद्रशासनाकडून म्हादई जलतंटा लवादाला आणखी १ वर्षाची मुदतवाढ
आल्त पर्वरी येथे ७ बंगल्यांमध्ये चोरी
कुडचडे येथे ४ ठिकाणी चोरीचा प्रयत्न
पार्से येथील एका व्यक्तीची ४ लाख २६ सहस्र रुपयांची ऑनलाईन फसवणूक
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वार्यासह मुसळधार पाऊस : अनेक ठिकाणी पडझड
‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संवर्धन आराखड्यां’तर्गत ४ मंदिरांतील मूर्तींची आज प्राणप्रतिष्ठा !