पोलीस ठाण्यातून अटकेत असलेला आरोपी पळाला !

कर्नाटकाचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांच्याच जिल्ह्यात पोलिसांचा निष्काळजीपणा

प्रतिकात्मक छायाचित्र

कलबुर्गी (कर्नाटक) – राज्याचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांच्या जिल्ह्यात कलबुर्गी येथे पोलीस ठाण्यातच पोलिसांना चकवा देऊन ‘पॉक्सो’ कायद्याखाली अटक असलेला एक आरोपी पसार झाला.

जिल्ह्यातील अफजलपूर पोलीस ठाण्यात ही घटना घडली असून पसार झालेल्या आरोपीचे नाव मंजुनाथ (वय २४ वर्षे) असे आहे. एका आठवड्यापूर्वी अल्पवयीन मुलीवरील अत्याचारांच्या संदर्भात त्याला अटक करून पोलीस ठाण्यात आणले होते. २ जुलैच्या पहाटे पोलीस झोपल्याचे पाहून आरोपी मंजुनाथ याने अतिशय हुशारीने स्वतःच्या हातातील हातकडी काढली. त्यानंतर कुणालाही कळू न देता पोलीस ठाण्याच्या परिसरातील झाडाच्या फांदीवरून कुंपण ओलांडून तो पळून गेला. हे सर्व दृश्य पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रित झाले आहे.

संपादकीय भूमिका

अशा पोलिसांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !