UCC In Maharashtra : महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता !

मुंबई – महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. याविषयीचा मसुदा सिद्ध आहे. त्यासाठी २ आठवड्यांत समितीची स्थापना केली जाणार आहे, असे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले. समितीची स्थापना आणि तिचे  काम, तसेच अधिकार हे अद्याप ठरलेले नाही.

गेल्या आठवड्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात माहिती दिली होती. ते म्हणाले होते, ‘‘कायद्याचा मसुदा सिद्ध करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली जाईल.’’