सर्वांमध्ये देव पहाणे !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

तुमची दृष्टी सुंदर असायला हवी. मग मार्गावरील दगड, माती, पाने, फुले यांमध्येही तुम्हाला देव दिसेल; कारण प्रत्येक गोष्ट देवानेच निर्माण केली आहे. देवनिर्मित आनंद कायमचा असतो !

आपणच देव होऊन जाणे ! : एकदा का आपल्यात भाव निर्माण झाला की, सर्व गुणांचे भांडार असणारा देवच आपल्या हृदयात येऊन राहू लागतो. तोच आपल्यात आला की, आपोआपच आपण त्याच्या सर्व गुणांशी एकरूप होऊ लागतो, यालाच ‘अंगी देवत्व येणे’, असे म्हणतात.

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, गोवा. (४.४.२०२०)