स्वतःभोवती श्रीरामाची प्रकाशमय कडा दिसणे आणि त्यात स्वतः विलीन झाल्याचे जाणवणे !

सौ. स्मिता राजेंद्र कानडे

एके दिवशी सकाळी मी प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रासमोर उभी राहून आर्ततेने प्रार्थना करत होते. त्या वेळी मला ‘माझ्या सहस्रारचक्रातून प्रकाशाचा झोत माझ्या शरिरात प्रवेश करत आहे’, असे जाणवले. मला त्या वेळी ‘श्रीरामाशी एकरूप व्हायचे आहे’, असे तीव्रतेने वाटत होते. थोड्या वेळाने मला माझ्या स्थूलदेहाचे अस्तित्व जाणवणे अल्प झाले. माझ्याभोवती श्रीरामाच्या आकृतीची प्रकाशमय कडा दिसत होती.

‘मीही प्रकाशमय झाले असून त्या आकृतीत विलीन झाले आहे’, असे जाणवत होते. त्यानंतर काही क्षण मला माझे अस्तित्व जाणवत नव्हते. ‘मी श्रीराममय झाले आहे’, असे वाटत होते. मला केवळ श्रीराम दिसत होता. ‘श्रीरामाच्या प्रकाशधारा सहस्रारचक्रातून वहात आहेत’, असे मला दिसले. मी आनंदात आणि श्रीरामाच्या चैतन्यात न्हाऊन निघाले. या अनुभूतीनंतर माझ्या मनातील नकारात्मक विचार न्यून होऊन सकारात्मक विचार वाढल्याचे लक्षात आले.

– सौ. स्मिता राजेंद्र कानडे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), मथुरा

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.