महिला अधिकार्याच्या विरोधात गुन्हा नोंद
मुलगी जिवे मारण्याची धमकी देत असल्याचीही आईची तक्रार

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – हापूड येथे तैनात असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा चौधरी यांच्या विरोधात त्यांच्याच आईने तक्रार प्रविष्ट केली आहे. आई मुनेश रानी यांनी त्यांच्या मुलीवर फसवणूक, बनावट कागदपत्रे बनवणे, भूमी हडपण्याचा कट रचणे आणि स्वतःच्या बँक खात्यात काळ्या कमाईचे १५ लाख रुपये जमा करणे यांसारखे गंभीर आरोप केले आहेत. यानंतर पोलिसांनी सीमा चौधरी यांच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
The cascade of corruption across India takes a stunning, unprecedented turn.
From IAS and IPS officers 👇 to local administration, Hapur DSO Seema Choudhary faces a case filed by her own mother for fraud, land grabbing, and black money!
Point to Ponder: Corruption thrives when… https://t.co/pvRQ0vw6xc pic.twitter.com/6zz1gdJ5jx
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 4, 2026
१. मुनेश रानी यांनी त्यांची मुलगी सीमा चौधरी यांच्यासह ५ जणांविरुद्ध पोलीस उपमहानिरीक्षकांकडे तक्रार केली आहे. त्यांनी तक्रारीमध्ये संजीव कुमार चौधरी, राजेंद्र राणा, गंभीर, नरेश कुमार आणि सीमा चौधरी यांना आरोपी म्हटले आहे. त्यांची मुलगी सीमा चौधरी आणि इतर आरोपी यांनी एकमेकांशी हातमिळवणी केली असून त्यांची एक भूमाफिया टोळी आहे. ही टोळी भूखंड लाटते, असा आरोप त्यांनी केला आहे.
२. तक्रारीत म्हटले आहे, ‘संजीव कुमार आणि राजेंद्र राणा यांनी माझ्या बँक खात्यात मला न सांगता १५ लाख रुपये जमा केले. हे खाते गाझियाबाद येथील आयसीआयसीआय बँकेत माझी मुलगी सीमा चौधरी हिने उघडले होते आणि तिच हे खाते चालवत होती. खाते उघडतांना सीमा चौधरीने स्वतःचा ईमेल पत्ता वापरला होता. सीमा चौधरी तिची ‘काळी कमाई’ माझ्या बँक खात्यात जमा करत होती. मला त्याची कल्पना नव्हती.’
३. तक्रारीमध्ये ‘आरोपी मला धमकावत असून मला जिवे मारण्याची धमकी दिली आहे’, असेही मुनेश रानी यांनी नमूद केले आहे.
४. पोलीस उपमहानिरीक्षक अभिषेक सिंह यांनी सांगितले की, त्यांच्याकडे मुनेश रानी यांनी तक्रार केली असून हे प्रकरण चौकशीसाठी पोलीस अधीक्षकांकडे पाठवण्यात आले आहे.
५. अन्वेषणानंतर सीमा चौधरी आणि अन्य यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी सीमा चौधरी किंवा इतर अन्य आरोपी यांनी अजूनही कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
बदलापूर येथे गोमांस विक्री करण्याच्या सिद्धतेत असलेल्या ३ धर्मांधांना अटक
८० वर्षांच्या वृद्ध महिलेवर ३५ वर्षांच्या सलमानने केला बलात्कार !
पाकिस्तानात आतंकवादी रियाज भटकळ याची हिंदु गुंडांनी करवून आणली हत्या !
महाभारतातील पौराणिक कथा जागतिक पातळीवर नेणार्या ज्येष्ठ लोककलाकार पद्मविभूषण तीजनबाई यांचे निधन
Priyank Kharge On RSS : (म्हणे) ‘मी असेपर्यंत रा.स्व. संघाला पथसंचलनासाठी अनुमती घेणे अनिवार्य !’
P.P. Govind Dev Giri Maharaj : श्रीराममंदिरातील चोरीच्या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही !