Priyank Kharge On RSS : (म्हणे) ‘मी असेपर्यंत रा.स्व. संघाला पथसंचलनासाठी अनुमती घेणे अनिवार्य !’

कर्नाटकाचे काँग्रेसचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांचे विधान

प्रियांक खर्गे

कलबुर्गी (कर्नाटक) – मी जोपर्यंत मंत्री आहे, तोपर्यंत राज्यात रा.स्व. संघाला  पथसंचलनासाठी अनुमती घेणे अनिवार्य आहे, असे विधान गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी येथे केले. प्रियांक खर्गे पुढे म्हणाले की, मी आधीच सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. १०० वर्षे जुनी संघटना म्हणता; मग तुमच्या संघटनेच्या नोंदी कुठे आहेत ? नोंदी कदाचित् कुठेतरी असतील, शोधून आणा. तोपर्यंत मी गप्प बसणार नाही.

संपादकीय भूमिका

कर्नाटकात धर्मांध मुसलमानांच्या कारवायांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असतांना त्याची घडी बसवण्याऐवजी संघाच्या मागे लागणारे काँग्रेसचे संघद्वेष्टे मंत्री !