
नवी देहली – छत्तीसगड राज्यातील ‘पंडवानी’ या लोककलेला जागतिक पातळीवर नेणार्या आदरणीय ज्येष्ठ लोककलाकार पद्मविभूषण तीजनबाई यांचे ५ जुलै २०२६ या दिवशी रायपूर येथील एम्स रुग्णालयात दु:खद निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. लोककलेतील त्यांच्या अतुल्य योगदानासाठी त्यांना ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार (१९९५), तसेच पद्मश्री (वर्ष १९८८), पद्मभूषण (वर्ष २००३), पद्मविभूषण (वर्ष २०१९) इत्यादी महत्त्वपूर्ण सन्मान मिळाले होते. त्यांनी ‘पंडवानी’च्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे, कथाकथन शैलीतून आणि भावपूर्ण अभिनयातून महाभारतातील कथांना जिंवत केले आणि जनसामान्यांना प्रभावित केले. छत्तीसगडमधील ‘पंडवानी’ लोककलेला पुनरुज्जीवन देणार्या त्या पहिल्या महिला पंडवानी लोकलाकार होत्या.
वर्ष २०१९ मध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने सुश्री तेजल पात्रीकर यांनी त्यांची भेट घेतली होती. ‘कै. तीजनबाई यांना सद्गती लाभो’, अशी श्रीकृष्णाच्या चरणी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने प्रार्थना !
‘पंडवानी’ म्हणजे काय ?
‘पंडवानी’ ही छत्तीसगडमधील एक पारंपारिक लोककला आहे. ‘पंडवानी’ म्हणजे पांडवांच्या कथा ! पंडवानीत महाभारतातील विविध कथा या अभिनय, गायन आणि नृत्य यांसह प्रस्तुत केल्या जातात.
८० वर्षांच्या वृद्ध महिलेवर ३५ वर्षांच्या सलमानने केला बलात्कार !
पाकिस्तानात आतंकवादी रियाज भटकळ याची हिंदु गुंडांनी करवून आणली हत्या !
Priyank Kharge On RSS : (म्हणे) ‘मी असेपर्यंत रा.स्व. संघाला पथसंचलनासाठी अनुमती घेणे अनिवार्य !’
P.P. Govind Dev Giri Maharaj : श्रीराममंदिरातील चोरीच्या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही !
कर्नाटक : २३० भ्रमणभाष, १७ घातक शस्त्रे आणि गांजा बाळगणार्या धर्मांधास अटक
Jalalabad Renamed : जलालाबाद आता बनले ‘भगवान परशुराम पुरी’