तुकाराम मुंढे यांच्याकडे कार्यभार सोपवणार !

मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – १३५ वर्षांची परंपरा असलेली, तसेच औषध निर्मितीच्या कार्यात भरीव योगदान देणारी महाराष्ट्र सरकारची ‘हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ’ ही संस्था सध्या मरणोन्मुख स्थितीत आहे. या महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी त्याचा कार्यभार अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे देण्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरि झिरवाळ यांनी ३ जुलै या दिवशी विधानसभेत केली.
काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड यांनी हाफकीन जीव-औषध निर्माण महामंडळाची स्थिती सुधारण्याविषयी, तसेच या संस्थेचे खासगीकरण केले जाणार आहे का ? अशी विचारणा तारांकित प्रश्नांमध्ये केली. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ‘महामंडळामध्ये झालेल्या अपहाराविषयी ‘कॅग’ने ताशेरे ओढले आहेत. ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्या अधिकार्यांवर सरकार कोणती कारवाई करणार ?’ असा प्रश्न उपस्थित केला.
झिरवाळ म्हणाले, ‘‘हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या १ इंच भूमीचीही विक्री केली जाणार नाही. या संस्थेचे खासगीकरण करण्याचा सरकारचा विचार नाही. या संस्थेतील भ्रष्टाचाराविषयी ३ मासांत अन्वेषण करून दोषींवर कारवाई करू.’’ आर्.ए. माशेलकर यांनी हाफकीनविषयी वर्ष २०१७ मध्ये सरकारला सादर केलेला अहवाल लवकरच सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे.
संपादकीय : ‘एनर्जी ड्रिंक’विषयी धोरण हवे !
रेल्वेत अनधिकृतपणे वावरणार्यांवर कठोर कारवाई केव्हा ?
पालखी मुक्कामी असतांना पुण्यातील पाणी कपात रहित ! – महापौरांची घोषणा
सौ. अरुंधती महाडिक यांच्याकडून इतिहास आणि पाककृती एकत्र असलेल्या पुस्तकाची निर्मिती !
‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचा शुभारंभ !
राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत !