विविध कलांची आवड असणारी आणि आईला सेवेत साहाय्य करणारी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची भोसरी (पुणे) येथील कु. साची कुलकर्णी (वय १५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. साची कुलकर्णी ही या पिढीतील एक आहे !

(‘कु. साची कुलकर्णी हिची वर्ष २०२६ मध्ये आध्यात्मिक पातळी ६४ टक्के आहे.’ – संकलक)

‘ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी (संकष्टी चतुर्थी, ३.७.२०२६) या दिवशी कु. साची कुलकर्णी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. साची कुलकर्णी हिला १५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !

कु. साची कुलकर्णी
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. कलागुण

‘गुढीपाडवा, महाशिवरात्र किंवा इतर समारंभ यांनिमित्त साची सुंदर रांगोळ्या काढते. ती कार्यक्रमांच्या वेळी चांगली सजावट करते. ती चित्रे चांगली काढते. तिला भरतनाट्यम् आणि कथ्थक या शास्त्रीय नृत्यांची आवड असून ती हे नृत्यप्रकार शिकत आहे. ती शालेय स्पर्धेच्या वेळी नृत्यरचना करते.

२. ‘आईला शिबिराला जाता यावे’, यासाठी घरकामांचे नियोजन करणे

जानेवारी २०२६ मध्ये मला रामनाथी, गोवा येथे झालेल्या साधना सत्संगाच्या शिबिराला जायचे होते. तेव्हा माझ्या मनात ‘घरातील सर्व कामांचे नियोजन कसे करू ?’, असे विचार येत होते. त्या वेळी कु. साचीने पुढाकार घेऊन नियोजन केले. तिने तिच्या आजीला विचारून काही अन्नपदार्थ बनवणे शिकून घेतले आहे. तिने नवीन अन्नपदार्थ बनवून घरातील सर्वांना दिले.

३. लहान भावाला सांभाळणे आणि घरकामांत साहाय्य करणे

सौ. सई कुलकर्णी

मी सेवेनिमित्त बाहेर गेल्यावर साची तिच्या लहान भावाकडून नामजप, तसेच अभ्यास करून घेते. ती धुतलेले कपडे वाळत घालते. ती वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालते. ती घरातील केर काढते.

४. सेवेत साहाय्य करणे

मला भ्रमणभाषवर सेवा करतांना अडचण आल्यास ती मला साहाय्य करते.

५. कु. साचीचे स्वभावदोष

आळशीपणा आणि स्वतःच्या मतावर ठाम असणे’

– सौ. सई संदीप कुलकर्णी (कु. साचीची आई), भोसरी, पुणे. (३०.५.२०२६)

राष्ट्र आणि धर्म यांविषयी जिज्ञासा असलेली कु. साची कुलकर्णी !

पू. (सौ.) मनीषा पाठक

१. ‘साची शांत आणि समंजस आहे.

२. ‘आईला अधिकाधिक सेवा करता यावी’, यासाठी साची आईला घरकामांत स्वतःहून साहाय्य करते. आई सेवेनिमित्त बाहेर गेल्यानंतर साची तिच्या लहान भावाला सांभाळते.

३. तिच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांविषयी जिज्ञासा आहे. त्याविषयी ती स्वतःहून प्रश्न विचारते.’

– (पू.) सौ. मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या संत, वय ४४ वर्षे), पुणे (३०.५.२०२६)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.