हिंदु मंदिरांचे महत्त्व !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘दक्षिणेतील काही प्राचीन मंदिरे आणि गुजरातमधील सोमनाथासारखे देवालय तुम्हाला पुष्कळ गोष्टी शिकवू शकतील. आपल्या हिंदूंच्या इतिहासाकडे पहाण्यासाठी कितीही ग्रंथ वाचून लाभणार नाही, एवढी तीक्ष्ण दृष्टी ही मंदिरे तुम्हाला देतील. ही मंदिरे शेकडो आघातांची आणि पुनरुज्जीवनाची प्रचीती कशी देत आहेत, ते पहा ! ती पुन्हा पुन्हा नष्ट केली गेली आणि त्याच भग्नावशेषांतून ती पुन्हा निर्मिली गेली अन् पूर्वीप्रमाणेच आजही ती दृढपणे उभी आहेत. आपल्या राष्ट्राचे मन आणि जीवन धर्मातच आहे.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)    ॐ