किटकांचा वावर आणि स्वच्छतेचा अभाव
राज्यात ३१ ठिकाणी धाडी

मुंबई – अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुंबईत धडक कारवाई करत अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणारे ६ हॉटेल, बेकरी आणि क्लब यांच्यावर कठोर कारवाई केली, तसेच त्यांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले. राज्यभर राबवण्यात आलेल्या विशेष पडताळणी मोहिमेत अस्वच्छता, मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री, चुकीच्या माहितीचे लेबल, किटकांचा वावर आणि आवश्यक कागदपत्रे यांचा अभाव, अशा अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. या मोहिमेच्या अंतर्गत राज्यातील ३१ ठिकाणी धाडी घालण्यात आल्या. पडताळणीच्या वेळी ३४ लाख ८७ सहस्र ६०३ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि इतर अन्नपदार्थ यांचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, वाहतूक आणि वितरण करणार्या १९ जणांना अटक करण्यात आली आहे, तसेच ३ वाहने जप्त केली आहेत.
१. नरीमन पॉइंट येथील ‘फ्लिंट अँड वार्सा’ या हॉटेलमध्ये चुकीच्या माहितीचे लेबल असलेले अन्नपदार्थ आढळून आले, तसेच मुदतबाह्य अन्नपदार्थ तात्काळ नष्ट करण्यात आले.
२. बोरिवली येथील एका बेकरीमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आढळली.
३. भांडुप, सांताक्रूझ, अंधेरी आणि वांद्रे येथील काही हॉटेलमध्येही स्वच्छतेचा अभाव, झुरळे अन् उंदीर यांचा वावर होता.
Malda Adinath Mandir : मालदा (बंगाल) येथील आदिनाथ मंदिर परत मिळवण्याचा हिंदु संघटनांचा प्रयत्न
Budaun Love Jihad : अपहरण, बलात्कार आणि धर्मांतराचा प्रयत्न या प्रकरणी शाकीर हुसेन याला १० वर्षांचा सश्रम कारावास
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
मूल्यांकन करून राज्यातील शासकीय रुग्णालयांचे होणार नामांकन !