(एफ्एटीएफ् म्हणजे आर्थिक कृती कार्य दल. आतंकवादाला आर्थिक साहाय्य होऊ देणार्या देशांवर ही जागतिक संस्था कारवाई करते)
नवी देहली – ‘फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स’ या संस्थेकडे भारत पाकिस्तानला पुन्हा ‘ग्रे लिस्ट’मध्ये (राखाडी सूची) समाविष्ट करण्याचे आवाहन करू शकतो. ऑक्टोबरमध्ये एफ्एटीएफ्ची पूर्ण बैठक होणार आहे. याच बैठकीत भारत, पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यासाठी दबाव आणू शकतो. यासाठी भारत अनेक व्हिडिओ आणि इतर पुरावे सादर करू शकतो, ज्यांच्या आधारे ‘पाकिस्तानने अजूनही जिहादी आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करणे थांबवलेले नाही’, हे स्पष्ट होईल. ऑक्टोबर २०२२ मध्ये त्याचे नाव ग्रे लिस्टधून हटवण्यात आले होते.
‘ग्रे लिस्ट’मध्ये समाविष्ट असलेल्या देशांना एफ्एटीएफ्च्या कठोर देखरेखीचा सामना करावा लागतो. तसेच आर्थिक गैरव्यवहार, आतंकवादाला अर्थपुरवठा आणि अण्वस्त्र प्रसारासाठी होणारा अर्थपुरवठा रोखण्याच्या त्यांच्या व्यवस्थेतील धोरणात्मक त्रुटी दूर करण्यासाठी वेळोवेळी त्यांचे पुनरावलोकन केले जाते. अशा देशांना जागतिक वित्तीय संस्थांकडून निधी मिळवण्यातही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर असे अनेक व्हिडिओ समोर आले होते, ज्येंमध्ये पाकिस्तानचे अनेक सैन्य कमांडर आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. सामाजिक माध्यमांवर याची छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित झाले होते. तसेच कुप्रसिद्ध आतंकवादी उघडपण आतंकवादी कारवायांसाठी लोकांकडे निधी देण्याचे आवाहन करताना दिसले होते.

Pakistan Gurdwara : पाकिस्तानात १२५ वर्षे जुने गुरुद्वारा भुईसपाट करण्याचा प्रयत्न
चीनच्या सैन्यासमवेत प्रतिवर्षी १ सहस्र १०० वेळा होतो सामना ! – General Upendra Dwivedi
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमधून आतंकवाद्याला अटक
अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याची घुसखोरी झालेली नाही ! – भारतीय सैन्याचे स्पष्टीकरण
(म्हणे) ‘जे पाणी अडवतील, त्यांचे हात तोडू !’ – Pakistani Minister Musadik Malik
आग लावणार्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा ! – सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांची मागणी