(म्हणे) ‘जे पाणी अडवतील, त्यांचे हात तोडू !’ – Pakistani Minister Musadik Malik

सिंधू जल वाटप करारावरून पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मलिक यांची पोकळ धमकी

पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मलिक

इस्लामाबाद (पाकिस्तान) – सिंधू जल वापट करारांतर्गत पाकिस्तानच्या वाट्यावर दावा सांगणार्‍यांचे हात कापून टाकले जातील. पाकिस्तानच्या पाण्याच्या अधिकारांवर गदा आल्यास गंभीर परिणाम होतील. पाण्याचा नळ शेजारील देशाच्या पंतप्रधानांच्या हातात आहे. ते म्हणतात की, ‘ते पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात वाहू देणार नाही’; मात्र पाकिस्तानसाठी निश्चित केलेल्या पाण्याच्या प्रवाहात कुणालाही अडथळा आणू दिला जाणार नाही, अशी धमकी पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मलिक यांनी सिंधू जल वाटप करारावरून भारताला अप्रत्यक्षरित्या दिली.  त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सामाजिक माद्यमांत प्रसारित झाला आहे.

संपादकीय भूमिका

भारतासमवेत पाकने केलेल्या ४ युद्धांत, तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतरही स्वतःच्या जनतेला मूर्ख बनवण्यासाठी पाकचे मंत्री अशा प्रकारची विधाने करत असल्याने त्यांची विधाने कुणी गांभीर्याने घेत नाही !