शिखांच्या विरोधामुळे थांबले पाडकाम !
फारुखाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील फारुखाबाद येथील १२५ वर्षे जुना ऐतिहासिक ‘गुरुद्वारा श्री सिंह सभा’ हा गुरुद्वारा स्थानिक भूमाफियांनी प्रशासनाशी हातमिळवणी करून भुईसपाट करण्याचा प्रयत्न केला. ही घटना २४ जूनच्या रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक शीख समुदायाचे लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी गोळा झाले आणि त्यांनी तीव्र विरोध दर्शवत तोडफोडीचे काम थांबवले. शिखांचा वाढता संताप आणि दबाव यांपुढे नमते घेत स्थानिक प्रशासनाने सध्या या ऐतिहासिक जागेला ‘सील’ (बंद) केला असून येथे कोणत्याही प्रकारच्या बांधकामास किंवा पुढील तोडफोडीस बंदी घातली आहे.
४ वर्षांपासून रचला जात होता कट !
स्थानिक शीख कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, या ऐतिहासिक वारशाचे अस्तित्व मिटवण्याचा कट गेल्या ४ वर्षांपासून रचला जात होता. ४ वर्षांपूर्वीपर्यंत या गुरुद्वारा साहिबच्या प्राचीन खुणा पूर्णपणे सुरक्षित होत्या, ज्याचा व्हिडिओही सामाजिक माध्यामांत प्रसारित झाला होता. त्यानंतर काही काळाने भूमाफियांनी गुरुद्वारा साहिबचा मुख्य घुमट तोडून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
कटात सहभागी असणार्यांवर कारवाई व्हावी !
शिखांचा आरोप आहे की, त्या वेळीही पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती; परंतु पाकिस्तानच्या ‘इव्हॅक्युएशन ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड’ आणि ‘पाकिस्तान सिख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटी’ने या अमूल्य वारशाचे रक्षण करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही, ज्याचा परिणाम आज सर्वांसमोर आहे.
शिखांनी मागणी केली आहे की, या कटात सहभागी असलेले भूमाफिया आणि भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी यांना त्वरित अटक करून त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जावी.
सध्या वक्फ बोर्डाने या प्रकरणात कायदेशीर कारवाईची सिद्धता चालू केल्याचे म्हटले आहे; परंतु शीख समुदायामध्ये अविश्वासाचे वातावरण कायम आहे.

चीनच्या सैन्यासमवेत प्रतिवर्षी १ सहस्र १०० वेळा होतो सामना ! – General Upendra Dwivedi
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमधून आतंकवाद्याला अटक
FATF Grey List : पाकिस्तानला पुन्हा ‘एफ्एटीएफ्’च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्याची भारताची सिद्धता
अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याची घुसखोरी झालेली नाही ! – भारतीय सैन्याचे स्पष्टीकरण
(म्हणे) ‘जे पाणी अडवतील, त्यांचे हात तोडू !’ – Pakistani Minister Musadik Malik
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा