व्यायाम प्रशिक्षक चांदणी कुरेशी हिने केलेल्या बुद्धीभेदानंतर इस्लामी स्वीकारून तिच्याशी केले होते लग्न !

शामली (उत्तरप्रदेश) – येथील आयुष मलिक याने पुन्हा हिंदु धर्म स्वीकारला आहे. आयुषने यापूर्वी मुसलमान तरुणी चांदणी कुरेशी हिने केलेल्या बुद्धीभेदामुळे तिच्याशी विवाह केला होता आणि धर्मांतर केले होते. त्याने प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये तो देवतांची पूजा करतांन, तसेच तसेच तो त्याचे वडील आणि आजी यांचे आशीर्वादही घेतांना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये तो पूर्वी ठेवत असलेली मोठी दाढी आणि केस कापल्याचे दिसत आहे. तो यात म्हणतो, ‘‘आई, मी इस्लाममध्ये गेलो होतो. मी धर्म पालटला होता; पण कुटुंबाच्या परिस्थितीमुळे आणि स्वतःच्या इच्छेने मी पुन्हा माझ्या कुटुंबाच्या मूळ हिंदु धर्मात परत आलो आहे. मला क्षमा कर.’’
शामली येथील औषध व्यावसायिक देवराज मलिक यांचा एकुलता मुलगा आयुष मलिक याचे हे प्रकरण गेल्या महिन्यात समोर आले होते. आयुषची व्यायाम प्रशिक्षक चांदणी कुरेशी हिने त्याचा बुद्धभेद करून ४ वर्षांपूर्वी फसवणूक करून विवाह केला होता. हे प्रकरण उघड आल्यानंतर चांदणी कुरेशी आणि तिच्या वडिलांना अटक करण्यात आली. ते सध्या कारागृहात आहेत.
चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपीठ परिसराच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र रचले जात असल्याचा दावा !
कर्नाटक : मशिदीसमोर फटके फोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून धर्मांधांनी शेतकर्याचा हात तोडला !
केंद्रशासनाकडून ‘धर्मस्वातंत्र्य’ विधेयकास संमत्ती मिळाल्यावर धर्मांतराच्या घटनांत त्या अंतर्गत कारवाई होणार ! -मुख्यमंत्री
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
मुंबईत ६ हॉटेलसह बेकरी आणि क्लब यांचे परवाने निलंबित : १९ जणांना अटक !
सोलापूर येथील अनधिकृत चर्च आणि महापालिका सेवकाची गैरकृत्ये यांची चौकशी होणार !