माणिक्यधारा धबधब्याच्या मार्गावर बेकायदेशीर थडगी बांधल्याने हिंदूंमध्ये संताप

चिक्कमगळुरू (कर्नाटक) – हिंदूंचे धार्मिक स्थळ असलेल्या दत्तपीठ परिसरात येथील प्रसिद्ध माणिक्यधारा धबधब्याकडे जातांना बेकायदेशीर हिरवी चादर चढवून नवीन थडगी बांधण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे. दत्तपीठापासून ६ किलोमीटर अंतरावर ही थडगी बांधली जात आहेत, असे म्हटले जात आहे. ‘या माध्यमातून परिसरात अनधिकृतपणे इस्लामच्या खुणा निर्माण केल्या जात आहेत आणि नवीन प्रथा राबवल्या जात आहेत’, असा दावा येथील बजरंग दलाच्या हिंदुत्वनिष्ठांनी केला. दत्तपीठावरील मालकी अधिकारावरून आधीच हिंदू आणि मुसलमान यांच्यात न्यायालयीन लढा चालू आहे. मुसलमान त्या जागेला ‘इनाम दत्तात्रेय बाबाबुडन स्वामी दर्गा’ या नावाने संबोधतात.
🚨 Tensions in Chikkamagaluru over Dattapeetha Area 🚨
Hindus express outrage over claims of alleged illegal graves built on the route to Manikyadhara Waterfall, calling it a conspiracy.
SP Jitendra Kumar Dayama clarifies:
❌ "Baseless claims" – Photos circulating are 6 years… pic.twitter.com/jlQkj72uoW— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 30, 2026
या अनधिकृत थडग्यांच्या विषयावर बजरंग दलाचे नेते रघु सकलेशपूर यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले, ‘धार्मिक बंदोबस्त विभाग आणि पोलीस यांच्या डोळ्यांसमोर हे बेकायदेशीर प्रकार घडत असतांनाही अधिकारी गप्प आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार दत्तपीठ परिसरात कोणत्याही नवीन प्रथा किंवा नवीन बांधकामाला अनुमती नाही. तथापि न्यायालयाच्या आदेशाला येथे पायदळी तुडवले जात आहे.’
जिल्हा प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून हिरवी चादर चढवून उपासना करण्यावर बंदी घालावी आणि बेकायदेशीर थडगी हटवावीत, अशी चेतावणी हिंदु संघटनांनी दिली आहे.
अनधिकृत थडगी उभारण्याची घटना निराधार ! – पोलीस अधीक्षक जीतेंद्र कुमार दायमा
या प्रकरणी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने चिक्कमगळुरूचे पोलीस अधीक्षक जीतेंद्र कुमार दायमा यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांनी दावा केला की, हिंदु संघटनांना मिळालेली माहिती चुकीची आहे. अनधिकृत थडगी उभारण्याची घटना निराधार आहे. दत्तपीठाचे प्रकरण सर्वाेच्च न्यायालयात चालू असून या परिसरात एकही नवे बांधकाम न उभारण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्या दृष्टीने आम्ही सतर्क आहोत. थडगी उभारल्याची छायाचित्रे ६ वर्षे जुनी असून तो विषय आता उचलला जात आहे. हिंदू-मुसलमानांनी यासंदर्भात शांतता राखली पाहिजे. हा विषय मी स्वत: बजरंग दलाचे रघु सकलेशपूर यांना स्पष्ट केला आहे.
अधीक्षकांच्या या भूमिकेची शहानिशा करण्यासाठी सकलेशपूर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही.
बालकांचा गुन्हेगारीसाठी वापर करणार्या टोळ्यांविरुद्ध ‘मकोका’ कायद्यांतर्गत कारवाई करणार ! – मुख्यमंत्री
कर्नाटक : मशिदीसमोर फटके फोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून धर्मांधांनी शेतकर्याचा हात तोडला !
केंद्रशासनाकडून ‘धर्मस्वातंत्र्य’ विधेयकास संमत्ती मिळाल्यावर धर्मांतराच्या घटनांत त्या अंतर्गत कारवाई होणार ! -मुख्यमंत्री
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
मुंबईत ६ हॉटेलसह बेकरी आणि क्लब यांचे परवाने निलंबित : १९ जणांना अटक !
आश्वासनांची पूर्तता गतीने होण्यासाठी महाराष्ट्र विधीमंडळ करणार ‘सॉफ्टवेअर’ची निर्मिती !