कर्नाटक : मशिदीसमोर फटके फोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून धर्मांधांनी शेतकर्‍याचा हात तोडला !

हावेरी (कर्नाटक) – येथील हानगल तालुक्यातील नरेगल गावात कार पौर्णिमेचा (वट पौर्णिमेचा) सण साजरा करत असतांना क्षुल्लक कारणावरून धर्मांध मुसलमानांनी एका शेतकर्‍याचा हात तोडला.

१. कार पौर्णिमेच्या उत्सवाच्या वेळी बैलंची शर्यत आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात तरुण आणि शेतकरी उत्साहाने सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बैल पळवत असतांना वाटेत एक मशीद लागली. या वेळी मशिदीजवळ काही जणांनी फटाके फोडले, असे सांगण्यात येत आहे.

२. यावर धर्मांध मुसलमानांया एका गटाने हिंदु शेतकरी आणि तरुण यांच्याशी भांडण चालू केले. या वेळी धर्मांधांच्या गटाने धारदार शस्त्रांद्वारे हिंदूंवर आक्रमण केले. या घटनेत शिवराज कुरुबर, नागप्पा कुरुबर, मल्लप्पा रायप्पा, लिंगराज महांतेश, जयप्पा संगप्पा, लोहित रेवणप्पा इत्यादी गंभीररित्या घायाळ झाले. या प्राणघातक आक्रमणाच्या वेळी धर्मांधांनी एका हिंदु शेतकर्‍याचा हातच तोडून टाकला.

३. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयी माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली.  घटनास्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

४. पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा नोंदवून पुढील अन्वेषण चालू केले आहे.

(मूळ ट्विट पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

संपादकीय भूमिका

  • मशिदीसमोर फटाके फोडल्याचे एक दिवसही सहन करू न शकणारे धर्मांध मुसलमान दिवसातून ५ वेळा हिंदूंना भोग्यांचा आवाज सहन करायला लावतात !
  • धर्मांध नेहमीच शस्त्रसज्ज असतात आणि बेसावध हिंदूंना लक्ष्य करतात, तर हिंदू  निषेध करण्यापलीकडे काहीच करत नाहीत !