आता मथुरा, वृंदावन आणि श्रीकृष्णजन्मभूमी यांविषयीही उघडपणे चर्चा झाली पाहिजे ! – Yogi Adityanath

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात रामभक्तांवर गोळ्या झाडल्या गेल्या होत्या, तर आज अयोध्येचे स्वरूप त्रेतायुगाची आठवण करून देते. आता मथुरा, वृंदावन आणि श्रीकृष्णजन्मभूमी यांविषयीही उघडपणे चर्चा झाली पाहिजे, असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे एका कार्याक्रमात केले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात सरकारी पैसा कब्रस्तान बनवण्यासाठी खर्च केला जायचा, तर आता तोच पैसा मंदिरे आणि विकासकामे यांसाठी खर्च केला जात आहे. मुरादाबादची ओळख आता दंगलींमुळे नाही, तर पितळ उद्योग आणि शेतकर्‍यांचे कष्ट यांमुळे आहे. राज्यामध्ये आता बाबर राज किंवा बाबरी विचारसरणी चालणार नाही, हे जनतेने सिद्ध करून दाखवले आहे.