४ जणांना अटक !

सुपौल (बिहार) – येथे नेपाळच्या मिशनरींनी येथील हिंदु गावकर्यांना उत्तम अन्न, विनामूल्य शिक्षण आणि आजारांपासून मुक्ती देण्याचे आमीष दाखवून त्यांना ख्रिस्ती पंथ स्वीकारायला लावण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. जागरूक गावकर्यांनी मिशनरींना पोलिसांच्या स्वाधीन केले.
१. मिशनरींचा एक गट नेपाळमधील भंटाबारी येथून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भीमनगर (बिहार) येथे पोचला. तेथून हा गट बनैलीपट्टीच्या हिंदु वस्तीत पोचला.
२. येथे किशुनदेव राम नावाच्या व्यक्तीच्या घरात एका प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला ३० ते ४० लोक उपस्थित होते. या ठिकाणी मिशनरींनी गावकर्यांना पैशांचे, आजार बरे करण्याचे आणि चांगल्या अन्नाचे आमीष दाखवून ख्रिस्ती बनण्यासाठी त्यांचा बुद्धीभेद करणे चालू केले.
३. याविषयी माहिती मिळताच इतर गावकरी घटनास्थळी पोचले. त्यांनी मिशनरींच्या धर्मांतराच्या प्रयत्नांना तीव्र विरोध दर्शवला.
४. याविषयी पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलिसांनी ४ मिशनरींना कह्यात घेतले आणि चौकशीसाठी वीरपूर पोलीस ठाण्यात नेले.
५. गावकर्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
Jakarta Pandit Dhirendrakrishna Shastri : श्रीराममंदिरातील दान चोरीतील मोठी नावे उघड केली, तर ते मला ठार मारतील !
बालकांचा गुन्हेगारीसाठी वापर करणार्या टोळ्यांविरुद्ध ‘मकोका’ कायद्यांतर्गत कारवाई करणार ! – मुख्यमंत्री
केंद्रशासनाकडून ‘धर्मस्वातंत्र्य’ विधेयकास संमत्ती मिळाल्यावर धर्मांतराच्या घटनांत त्या अंतर्गत कारवाई होणार ! -मुख्यमंत्री
मुंबईत ६ हॉटेलसह बेकरी आणि क्लब यांचे परवाने निलंबित : १९ जणांना अटक !
सोलापूर येथील अनधिकृत चर्च आणि महापालिका सेवकाची गैरकृत्ये यांची चौकशी होणार !
शामली (उत्तरप्रदेश) येथील आयुष मलिक याने इस्लाम सोडून पुन्हा हिंदु धर्म स्वीकारला !