‘वर्ष २०२६ च्या मे महिन्यात मी सेवेनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यानंतर मला पुष्कळ चैतन्य जाणवले.
२. मी सेवा करत असतांना माझा नामजप चालू होता. तेव्हा मला पुष्कळ आनंद मिळाला.
३. मी ध्यानमंदिरात आरती म्हणत असतांना ‘प.पू. डॉक्टर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्याकडे पहात असून ते माझ्याशी बोलत आहेत’, असे मला जाणवले. मला ध्यानमंदिरात पुष्कळ चैतन्य जाणवत होते.

४. व्यष्टी साधनेचा आढावा देतांना ‘आत्मनिवेदन कसे करायचे ? चिंतन सारणी (टीप) लेखन कसे करायचे’, ते मला समजले.
(टीप : चिंतन सारणी : साधकांची व्यष्टी साधना, नामजप, प्रार्थना, कृतज्ञता, भावजागृतीचे प्रयत्न आदींचा आढावा घेण्यासाठी केलेली सारणी)
५. पूर्वी मी माझ्याकडून झालेल्या चुका लिहीत नव्हते; मात्र आश्रमात आल्यावर स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यावर मी सारणीत चुका लिहू लागले. आश्रमात आल्यामुळे माझ्यातील स्वभावदोष काही प्रमाणात न्यून झाल्याचे माझ्या लक्षात आले.
६. एकदा मी महाप्रसाद घेत असतांना माझ्या बाजूला पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे (समष्टी) संत, वय ५१ वर्षे) बसले होते. त्या वेळी मला त्यांच्यातील चैतन्याचा लाभ झाला.
७. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्त साधिका सभागृहात पणती लावण्याची सेवा करत होत्या. तेव्हा मी तिथून जात असतांना एका खोलीचे दार उघडले. तेव्हा मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन झाले. तेव्हा मी त्यांना मानस नमस्कार केला.
‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर मला पुष्कळ चैतन्य अनुभवायला मिळाले’, त्याबद्दल मी देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– कु. संजना संतोष तावडे (वय १५ वर्षे), रत्नागिरी (१६.५.२०२६)
वर्णांनुसार साधनेचे महत्त्व आणि चारही वर्णांची साधना करवून मोक्ष देणारी गुरुकृपायोगानुसार साधना
प्रत्येक सेवा आणि कृती मनापासून अन् भावपूर्ण करणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने (वय ७७ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात मंत्रपठण करतांना साधिकेला आलेली अनुभूती
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘देह असला काय किंवा नसला काय, त्यासंदर्भात काहीच वाटत नाही’, याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकणे म्हणजे, ईश्वर, देवता यांच्यासह वाईट शक्तींचाही अभ्यास असणे आवश्यक !
आनंदी, प्रेमळ आणि सहनशील वृत्तीच्या रत्नागिरी येथील कै. (सौ.) कविता औंधकर (वय ७२ वर्षे) !