रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात मंत्रपठण करतांना साधिकेला आलेली अनुभूती

सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा

१. प्रतिदिन मंत्रपठण करतांना डोकेदुखीचा त्रास होणे; मात्र सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करून मंत्रपठण चालू ठेवल्यावर तो त्रास आपोआप न्यून होणे आणि नंतर कधीही डोके न दुखणे

सौ. आवडू देसाई

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आम्ही प्रतिदिन सकाळी नवग्रह मंत्रपठण करतो आणि सायंकाळी नवग्रह मंत्रपठण करतो अन् श्रीरामरक्षास्तोत्र म्हणतो. मी प्रथमच मंत्रपठण करण्यासाठी गेल्यावर ३ – ४ दिवसांनी मंत्रपठण करतांना मला डोकेदुखीचा त्रास चालू झाला. त्यामुळे ‘मंत्रपठण करू नये’, असे मला वाटत होते, तरीही मी प.पू. गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना केली, ‘भगवंता, ‘या त्रासामुळे माझ्या साधनेत अडथळे येत आहेत. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी तूच मला शक्ती दे.’ मी भगवंताला शरण जाऊन मंत्रपठण करत होते. अनुमाने १० मिनिटांनी माझे डोके दुखायचे आपोआपच थांबले. त्यानंतर मला आतापर्यंत ३ मास झाले, तरीही डोकेदुखीचा एकदाही त्रास झाला नाही.

२. साधिकेला अनुभूती लिहून द्यावीशी न वाटणे, दुसर्‍या साधिकेने अनुभूती लिहून देण्याविषयी सुचवल्यावर ‘देवच तिच्या माध्यमातून सांगत आहे’, असा भाव ठेवून अनुभूती लिहून देता येणे

‘ही अनुभूती लिहून द्यायला नको’, असे मला वाटत होते. मी एका साधिकेला या अनुभूतीविषयी सांगितले. तेव्हा ती साधिका म्हणाली, ‘‘अनुभूती छान आहे. लिहून दे.’’ तिच्या माध्यमातून ‘देवच मला अनुभूती लिहून देण्यास सांगत आहे’, असा मी विचार केला. ‘मी देवाला प्रार्थना केल्यावर देवानेच ही अनुभूती लिहून घेतली’, त्याबद्दल मी देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. आवडू देसाई (वय ७० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक