अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता

हॉर्मुझमधून नौकांची वाहतूक चालूच रहाणार

वॉशिंग्टन (अमेरिका) – युद्धबंदीचा करार झाल्यानंतर अवघ्या ९ दिवसांत इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यानंतर आता दोघांनीही एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता दर्शवली आहे. ३० जून या दिवशी दोन्ही देशांचे प्रतिनिधी कतारमध्ये चर्चा करणार आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यात झालेल्या करारानुसार हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणार्‍या व्यापारी नौकांच्या वाहतुकीत कोणताही अडथळा आणला जाणार नाही. अलीकडच्या काळात या जलमार्गावरून दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता.