प्रत्येक सेवा आणि कृती मनापासून अन् भावपूर्ण करणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने (वय ७७ वर्षे) !

श्री. यशवंत वसाने

१. देवपूजेसाठी आणलेल्या फुलांची केलेली रचना पाहून भावजागृती होणे

देवपूजेसाठी आणलेल्या फुलांची केलेली रचना

‘श्री. यशवंत वसाने (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ७७ वर्षे) यांच्याकडे देवद आश्रम परिसरातील पूजेसाठी फुले आणण्याची सेवा आहे. काका सकाळी ६ वाजता फुले काढतात. नंतर काका ती फुले आश्रमातील ध्यानमंदिर, शिवमंदिर, अन्नपूर्णाकक्ष, धान्यलक्ष्मीकक्ष, परात्पर गुरु पांडे महाराज यांची खोली यांतील देवतांच्या मूर्ती आणि प्रतिमा यांना वहाण्यासाठी अन् प्रवेशद्वारासमोर असलेले प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आणि त्यांनी प्रवासासाठी वापरलेले चारचाकी वाहन यांना वहाण्यासाठी वेगवेगळ्या ‘प्लॅस्टिक’च्या वाट्यांमध्ये ठेवतात. काकांनी त्या वाट्यांत ठेवलेली फुले आणि त्या वाट्यांची केलेली रचना हे पाहून माझी भावजागृती होते. वसानेकाका फुले काढणे, त्यांचे वर्गीकरण करणे, ठरलेल्या ठिकाणी पूजेसाठी फुले देणे, या सर्व सेवा मनापासून आणि भावपूर्ण करतात.

श्री. शंकर नरुटे

२. प्रत्येक सेवा सहजतेने आणि मनापासून स्वीकारणे

काकांना कुणीही आणि कोणतीही सेवा सांगितली, तरीही ते ती सेवा सहजतेने अन् मनापासून स्वीकारतात. काकांनी सेवा केल्यावर त्यांच्यात कर्तेपणा जाणवत नाही. ‘काकांमध्ये भाव असल्यामुळे ते प्रत्येक कृती भावपूर्ण आणि आनंदाने करतात’, असे मला वाटते.’

– श्री. शंकर राजाराम नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.४.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक