हिंदु धर्मातील ‘अद्भुत’ गोष्टींना नाकारणे, ही बुद्धीवादाच्या प्रामाणिक क्षेत्राचेही अतिक्रमण !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

महाभारतातील ऐतिहासिक सत्य मान्य करण्यामध्ये अनेकांना ‘अद्भुत’ ही एक महत्त्वाची अडचण वाटते. ‘अद्भुत’ नाकारण्यामागे एक प्रकारचा श्रद्धाहीनतेचाही भाग आहे. अलीकडील काळातील अनेक साधूसंत आणि तीर्थक्षेत्र यांच्यासंबंधी चमत्कार म्हणता येईल, अशा कथा प्रत्यक्ष अनुभवलेले अनेक लोक आहेत. त्यांनी वृत्तपत्रातून वा इतर प्रकारच्या वाङ्मयातून स्वतःचे हे अनुभव प्रगटपणे नोंदवून ठेवले आहेत. त्या सर्वांना एकजात भोळसट, बावळट वा दांभिक म्हणून बाजूला काढणे वस्तूतः अशक्य आहे. रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र विस्तृतपणे उपलब्ध आहे. त्यात ‘अद्भुत’ म्हणता येईल, अशा गोष्टींची उणीव नाही. या असल्या गोष्टींना केवळ थोतांड म्हणणे, म्हणजे बुद्धीवादाच्या प्रामाणिक क्षेत्राचेही अतिक्रमण करणे आहे, असे मला वाटते.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘महाभारताचे वास्तव दर्शन’)