श्रद्धेसारखा मूलभूत विषय उपेक्षणीय मानणे अनिष्ट !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

आपले सर्व चांगले-वाईट, हवे-नको, हे तसे, तर सगळेच श्रद्धेवर आधारलेले असते. शहाणा माणूस आपल्याला चांगले किंवा वाईट वाटते त्याचा वा हवे नकोचा निर्णय कुणा विश्वासू माणसाच्या सांगण्यावरून आणि शास्त्रीय वाक्यांच्या आधारे घेतो. गोड किंवा तिखट मला आवडते म्हणून चांगले वाटते हे खरे; पण त्याचा स्वीकार करणे वा न करणे अथवा प्रमाण ठरवणे, हे तज्ञ चिकित्सकाच्या आदेशानुसार स्वीकारावे लागते. अन्यथा आरोग्याची हानी वाट्यास येते, म्हणजे जीवनाच्या साध्या साध्या गोष्टीतही श्रद्धेचा अवलंब करावा लागतो. कोणतेही शब्दप्रामाण्य स्वीकारणे, ही श्रद्धाच आहे. यास्तव या श्रद्धेसारखा मूलभूत विषय हा उपेक्षणीय मानणे अनिष्ट आहे. माणसाचे वैशिष्ट्य श्रद्धाच आहे. मनुष्योत्तर प्राण्यात हा श्रद्धा विषय आढळणार नाही.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ग्रंथ ‘साधक साधना’)