गुन्हा नोंदवण्याची आणि न्यासाची पुनर्रचना करण्याची शिफारस
अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीरामंदिरातील दानाच्या चोरीच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष अन्वेषण पथकाने पहिल्या टप्प्याचा चौकशी अहवाल राज्य सरकारकडे सोपवला. हा अहवाल गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांना सादर करण्यात आला. पथकाने सांगितले की, हा १५० पानांचा प्राथमिक अहवाल आहे. यात १५० लोकांच्या चौकशीचा तपशील आहे. सविस्तर अहवालासाठी पथकाने अधिक वेळ मागितला आहे. या अहवालावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निर्णय घेणार आहेत.
यात गुन्हा नोंदवण्यासह श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची पुनर्रचना करणे, एका वरिष्ठ अधिकार्याची मंदिराचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करणे, तसेच गेल्या ५ वर्षांच्या देणग्यांचे लेखापरीक्षण करणे, या शिफारसीही करण्यात आल्या आहेत. देणग्यांमधील अनियमितता रोखण्यासाठी सूचना दिल्या आहेत.
२०० कोटी रुपयांची चोरी झाल्याची शक्यता !
चोरीच्या प्रकरणात लवकुश, अवनीश, अनुकल्प, करुणे आणि रामशंकर उपाख्य टिन्नू या ५ संशयितांच्या माहितीवरून २ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. याव्यतिरिक्त, चंपत राय यांच्या जवळच्या असणार्या टिन्नूच्या घरातून सोने सापडले होते. प्राथमिक अंदाजानुसार चोरी २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची असू शकते.

पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !