२१.६.२०२६ या दिवशी ‘जागतिक संगीत दिन’ झाला त्यानिमित्ताने…

१. विविध प्रकारच्या भारतीय वाद्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !
‘२४.१०.२०२५ या दिवशी मी घरी असतांना माहितीजालावर भारतीय वाद्ये वाजवणार्या कलाकारांची जुगलबंदी ऐकत होते. ती ऐकत असतांना मला विविध अनुभूती आल्या आणि मला भारतीय वाद्यांची पुढील वैशिष्ट्ये जाणवली.


टीप १ – चर्म वाद्ये : प्राण्यांच्या चर्माचे (कातड्याचे) आच्छादन असलेली वाद्ये. यांवर हाताने किंवा काठीने आघात केल्यास कंपने निर्माण होऊन लयबद्ध ध्वनी उत्पन्न होतो.
टीप २ – तंतू वाद्ये : तारांच्या कंपनांद्वारे नाद किंवा स्वर निर्माण करणारी वाद्ये.
टीप ३ – सुशीर वाद्ये : हवेचा वापर करून किंवा फुंकर मारून ध्वनी (नाद) निर्माण करणारी वाद्ये.
२. विविध प्रकारचे नाद ऐकल्यावर आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे
मी नादांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी माहितीजालावर विविध प्रकारचे नाद ऐकले. निसर्गातील घटकांशी संबंधित असणारे नाद आणि विविध सात्त्विक वाद्यांचे नाद ऐकल्यावर मला वेगवेगळ्या अनुभूती आल्या. त्यांचे सविस्तर विवेचन पुढील सारणीत केले आहे.


टीप – निसर्गातील घटकांशी संबंधित असणारे नाद हे नैसर्गिक असल्यामुळे ते मूळ स्वरूपातील आहेत. त्यामुळे त्यांना ‘मूळ नादब्रह्म’, असे संबोधले आहे. सात्त्विक वाद्यांचे नाद हे पूर्णपणे सात्त्विक स्वरूपातील असल्यामुळे त्यांना ‘शुद्ध नादब्रह्म’, असे संबोधले आहे.

३. निष्कर्ष
भारतीय वाद्यांच्या नादाचे चलत्चित्र पहाण्याआधी माझे डोके जड झाले होते आणि मला काहीही सुचत नव्हते. जेव्हा मी भारतीय वाद्यांचा नाद ऐकला, तेव्हा मला होणारे विविध त्रास दूर होऊन माझ्या शरिराला हलकेपणा आणि मनाला आनंद अन् उत्साह जाणवू लागला. त्यामुळे ‘भारतीय वाद्यांच्या नादामध्ये आध्यात्मिक स्तरावरील लाभ होण्याचे पुष्कळ सामर्थ्य आहे’, हे सूत्र मला शिकायला मिळाले.’
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ९.६.२०२६)
स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) : आयुर्वेदाचा समतोलाचा मार्ग
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)
देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ देवलोकात होत असल्याची साधिकेला आलेली प्रचीती !
परस्परावलंबनाचा बोध देणारा ‘योग’ !