
‘आहार कसा घ्यावा ?’, याचे फारच सुंदर वर्णन आयुर्वेदात सांगितले आहे. ‘ताट वाढतांना डाळ-भात कुठे वाढावा, भाजी, कोशिंबिर, लोणचे, पोळी किंवा भाकरी कुठे आणि कशी वाढावी ?’, याचे ही वर्णन आपल्या पूर्वाचार्यांनी सांगितले आहे.

‘कसे रहावे ?’, ‘काय खावे ?’ यासमवेतच ‘प्रत्येक प्रकृतीच्या व्यक्तीने काय खावे ?’, हेही आयुर्वेदात सांगितलेले आढळते. आहारात षड्रसांचा म्हणजे मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू, तुरट या ६ रसांचा समावेश असल्यास शरिरातील वात, पित्त, कफ हे त्रिदोष समावस्थेत राहून रोगप्रतिकारकशक्ती वाढते. जसे मधुर, आम्ल, लवण रस हे वात आणि पित्त दोष न्यून करणारे, तर कफ वाढवणारे आहेत. तिखट, कडू, तुरट हे रस कफ न्यून करणारे, तर वात आणि पित्त वाढवणारे आहेत. प्रत्येक दोषावर कुठला रस काम करतो, हे सांगितलेले असल्याने त्या प्रकारची आहाराची योजना त्या त्या प्रकृतीच्या व्यक्तीने केल्यास स्वास्थ्य प्राप्त होईल ! आपण नित्य आहारात गोड, खारट, आंबट, तिखट आणि फार फार तर तुरट खातो; परंतु कडू रस की, जो सर्व रसांचा ‘अँटीडोस’ म्हणून काम करतो, तो आहारात शक्यतो नसतोच. पूर्वी कारले थोडेफार खाण्यात यायचे; परंतु सध्याचे ‘हायब्रीड’ कारलेही गोडच लागते. त्याचे श्रेय बायका घेतात आणि म्हणतात ‘बघा माझ्या हातचे कारले किती गोड लागते ते..!’ म्हणून ‘औषध हे कडू गुणाचे असावे’, असे शास्त्र सांगते.
म्हणून नेहमी सुदृढ रहाण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या आहारात मधुर (गुळ, मध), आम्ल (चिंच, आवळा), लवण (सैंधव, मीठ), कटु (मिरची, मिरे), तिक्त म्हणजे कडू (हळद, मेथी, कारली) आणि तुरट (हिरडा) यांचा समावेश करावा.
– वैद्य रामदास आव्हाड, कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर.
(साभार : ग्रंथ ‘आहार आणि आरोग्य’ रामदासकृत पंचकर्मबोध
गरम शेक आणि गार शेक
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
लसिका प्रणाली पूर्णपणे सक्रीय ठेवण्यासाठी केवळ दाब देण्यापेक्षा नियमित आणि योग्य पद्धतीने व्यायाम करणे आवश्यक !
संपादकीय : शुभ्र क्रांतीचा विकास ?
हस्तक्षेप आणि विध्वंस यांच्या माध्यमातून विश्वासार्हता गमावलेले साम्राज्य म्हणजे अमेरिका !