१. युद्धविरामासाठी अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटी
‘जवळपास १०० दिवसांनंतर आखाती प्रदेशातील युद्ध एका नव्या टप्प्यात आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये चालू झालेला अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष थेट सैनिकी कारवाई, सागरी नाकेबंदी, क्षेपणास्त्रांची आक्रमणे, ड्रोन युद्ध आणि हिजबुल्ला, हुती, हमास इत्यादींसारख्या आतंकवादी संघटनांच्या सक्रीय सहभागानंतर आता एका स्थिर पातळीवर पोचला आहे. त्यातून काही नवीन साध्य होण्याची शक्यता फारच अल्प आहे. आता करार किंवा युद्धविराम यांसाठी अमेरिका आणि इराण यांच्यात वाटाघाटी होऊन तो करार पूर्णत्वाला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अनेक वेळा युद्ध समाप्तीची आणि त्याहूनही अधिक वेळा इराणसह करार करण्याची घोषणा केली आहे; परंतु यापैकी कशाचाही तार्किक निष्कर्ष निघालेला नाही. अमेरिका आणि इस्रायल यांच्या अनुमानाच्या विपरीत जून २०२६ पर्यंतही इराणची क्षेपणास्त्र क्षमता पूर्णपणे नष्ट झालेली नाही. ती वेळोवेळी इस्रायल आणि अमेरिका यांच्या हितसंबंधांना लक्ष्य करत आहे. इतकेच नव्हे, तर इराण त्याच्या इच्छित लक्ष्यांवर अधिक प्रभावीपणे आक्रमणे करत आहे.
अमेरिकेने युद्ध संपल्याची घोषणा केली आहे; परंतु इस्रायल अद्यापही दक्षिण लॅबेनॉनमध्ये सैनिकी कारवाया करत आहे आणि हिजबुल्लाच्या ठिकाणांवर आक्रमणे करत आहे. त्याच वेळी हिजबुल्ला उत्तर इस्रायलवर रॉकेट आणि ड्रोन यांनी आक्रमणे करत आहे. तथापि अमेरिकेने या प्रदेशात विमानवाहू नौका, स्ट्रॅटेजिक बाँबर्स, ‘एफ्-३५’ आणि ‘एफ्-२२’ ही लढाऊ विमाने, क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि नौदल तैनात केले आहे. अमेरिकेचे सैन्य पर्शियन आखात आणि अरबी समुद्र येथे सतत सक्रीय आहे.
इराणचा हॉर्मुझ सामुद्रधुनीवरील प्रभाव जागतिक व्यापारासाठी आव्हान
इराणने हे युद्ध प्रामुख्याने ‘असममित युद्ध’ म्हणून लढले आहे. त्याने ‘बॅलिस्टिक’ (आंतरखंडिय) क्षेपणास्त्रे, ड्रोन नेटवर्क, सागरी क्षमता, तसेच हिजबुल्ला आणि हुती यांसारख्या आतंकवादी संघटनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील त्याचा प्रभाव अमेरिका आणि जागतिक व्यापार यांसाठी एक मोठे सामरिक आव्हान आहे.
– मेजर सरस त्रिपाठी (निवृत्त)
२. अमेरिकेने वारंवार धमक्या देऊन नंतर माघार घेण्याची कारणे
अ. युद्धाचा आर्थिक व्यय : अमेरिका वारंवार धमक्या देऊन नंतर माघार का घेते ?, हा प्रश्न राजकीय आणि सामरिक अशा दोन्ही दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. याची अनेक कारणे आहेत. युद्धाचा वाढता आर्थिक व्यय हे पहिले कारण आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या मते युद्धाच्या प्रारंभीच्या दिवसांत अब्जावधी डॉलर्स व्यय झाले. स्वतंत्र विश्लेषणातून असे दिसून येते की, पहिल्या ६ दिवसांत ११ अब्ज डॉलर्सहून अधिक (१ लाख कोटींहून अधिक रुपये) व्यय झाला.
आ. प्रादेशिक विस्ताराचा धोका : युद्ध आणखी वाढले, तर ते इराक, सीरिया, लॅबेनॉन, येमेन आणि इतर आखाती देश यांमध्ये पसरू शकते. त्याने लॅबेनॉनला आधीच आपल्या विळख्यात घेतले आहे.
अमेरिकेने युद्धविराम करण्याची कारणे
अमेरिकेला हे लक्षात आले आहे की, इराणला थेट सैनिकी मार्गाने पराभूत करता येणार नाही. त्यामागे हॉर्मुझची सामुद्रधुनी, इराणचा आकार आणि भूगोल अन् इराणचे हस्तक, म्हणजेच छुपी सैनिकी शक्ती, ही ३ कारणे आहेत. हुती, हिजबुल्ला आणि हमास हे अमेरिका आणि इस्रायल या दोघांसाठीही मोठ्या अडचणी निर्माण करतात.
– मेजर सरस त्रिपाठी (निवृत्त)
इ. देशांतर्गत राजकीय दबाव : अमेरिकेची जनता दीर्घकाळ चालणार्या युद्धांना कंटाळली आहे. अफगाणिस्तान आणि इराक यांच्याशी झालेल्या युद्धाचे अनुभव अजूनही अमेरिकी राजकारणावर प्रभाव टाकतात. चौथे आणि सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे अमेरिकेच्या सर्वोत्कृष्ट प्रयत्नांनंतरही हॉर्मुझची सामुद्रधुनी अनियंत्रित राहिली आहे. त्याच्या नाकेबंदीचा परिणाम जागतिक तेलपुरवठा आणि अमेरिकी अर्थव्यवस्था या दोन्हींवर होत आहे. त्यातही अमेरिका अद्याप हॉर्मुझला इराणच्या नियंत्रणातून मुक्त करू शकलेली नाही, हे विशेष खेददायक आहे. त्यामुळे ‘दबाव आणि वाटाघाटी’ या दोन्हींचा मेळ घालण्याचे अमेरिकेचे धोरण राहिले आहे.

३. युद्धामुळे अमेरिकेची मोठ्या प्रमाणात जीवित आणि आर्थिक हानी
‘अमेरिका मानसिकदृष्ट्या युद्ध हरली आहे’, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. अमेरिका अजूनही जगातील सर्वांत मोठी सैनिकी शक्ती आहे; परंतु हे निश्चितपणे म्हणता येईल की, ती स्वतःची घोषित राजकीय उद्दिष्टे लवकर साध्य करू शकलेली नाही. युद्धाचा उद्देश ‘प्रतिस्पर्ध्याची इच्छाशक्ती मोडणे’, हा असेल, तर इराण अजूनही प्रतिकार करत आहे. त्यामुळेच अमेरिका सैनिकी विजयासह राजकीय तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. अमेरिकेने अजूनही मोठा सैनिकी साठा राखला आहे. त्यामुळे त्यांची शस्त्रे संपत आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींवर प्रचंड ताण आला आहे, हे खरे असले, तरी महागड्या ‘इंटरसेप्टर’ (शत्रूच्या क्षेपणास्त्रांना मध्येच रोखू शकणारे लढाऊ विमान)चा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. लाल समुद्र आणि आखाती प्रदेश येथे दीर्घकाळ चाललेल्या कारवाया यांमुळे ‘लॉजिस्टिक’चा (वाहतुकीचा) व्यय वाढला आहे. त्यामुळे समस्या शस्त्रास्त्रांच्या कमतरतेची नसून ती पुन्हा मिळवण्याचा अधिक व्यय आणि वेग यांची आहे.
याखेरीज अमेरिकेची मोठ्या प्रमाणात जीवित आणि आर्थिक हानी झाली आहे. सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या स्रोतांनुसार जून २०२६ पर्यंत अमेरिकेला अब्जावधी डॉलर्सची हानी झाली आहे.
४. युद्धामुळे इस्रायलचे नागरी जीवन, अर्थव्यवस्था आणि संरक्षण प्रणाली यांवर दबाव
इस्रायलची परिस्थितीही अपेक्षेहून अधिक कठीण आहे. इस्रायलला प्रारंभी जलद विजयाची आशा होती; परंतु युद्ध अपेक्षेहून अधिक काळ चालले. क्षेपणास्त्र आणि ड्रोन यांच्या आक्रमणांमुळे नागरी जीवन, अर्थव्यवस्था अन् संरक्षण प्रणाली यांवर दबाव वाढला आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनाही देशांतर्गत राजकीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे. काही विश्लेषकांच्या मते इस्रायल सैनिकीदृष्ट्या बलशाली असला, तरी त्याचीही अपेक्षेहून अधिक आर्थिक आणि सामरिक हानी झाली आहे.
सरकारच्या युद्ध धोरणाच्या विरोधात तेल अवीव, हैफा आणि इतर शहरांमध्ये निदर्शनेही झाली आहेत. इस्रायलला हिजबुल्ला आणि हुती यांच्याकडूनही अतिरिक्त आघातांना सामोरे जावे लागत आहे. इस्रायल हिजबुल्लाला पूर्णपणे निष्प्रभ करू शकलेला नाही. हुतींकडून लाल समुद्र आणि सागरी मार्ग यांना धोका कायम आहे. अनेक आघाड्यांवरील युद्ध (इराण, लॅबेनॉन आणि येमेन) इस्रायलसाठी अपेक्षेहून अधिक कठीण ठरले आहे.
५. युद्ध अनिश्चित काळासाठी चालू ठेवणे दोन्ही बाजूंना अशक्य !
जून २०२६ पर्यंत अमेरिका-इस्रायल युतीला निर्णायक विजय मिळवता आलेला नाही, तसेच इराणलाही त्यांच्या विरोधकांना पराभूत करता आलेले नाही. या युद्धाने हे सिद्ध केले आहे की, आधुनिक संघर्ष केवळ सैनिकी सामर्थ्याने जिंकले जात नाहीत, तर आर्थिक लवचिकता, राजकीय इच्छाशक्ती, प्रादेशिक आघाड्या आणि जनमत हे तितकेच महत्त्वाचे आहेत. सध्याचे संकेत असे दर्शवतात की, सर्व बाजू कोणत्या तरी प्रकारच्या तडजोडीकडे वाटचाल करत आहेत; कारण युद्ध अनिश्चित काळासाठी चालू ठेवणे, हे दोन्ही बाजूंच्या हिताचे किंवा क्षमतेचे नाही.’
– मेजर सरस त्रिपाठी (निवृत्त), गाझियाबाद, उत्तरप्रदेश.

हिंदु दांपत्याला मुसलमान मुलीचे पालकत्व देण्याविषयी मदुराई उच्च न्यायालयाचा (तमिळनाडू) निवाडा !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी स्वतःची पाठ थोपटणे आणि भारताने घ्यावयाचा धडा !
‘ॲमेझॉन’च्या ‘ॲमेझॉन नाऊ’ विज्ञापनातून थोर शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा अक्षम्य अवमान !
इस्रायलने वास्तवाचे भान ठेवावे : त्याला आता अमेरिका हाच एकमेव मित्र ! – JD Vance
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांतरांच्या घटनांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली