धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळा (श्री सरस्वतीदेवीचे मंदिर) नमाजमुक्त होणे आणि लगेचच प्रभादेवी, मुंबई येथे श्री राजमातंगीदेवीचा महायज्ञ होणे, हे दैवी संकेत !

श्री वाग्देवीची मूर्ती

‘११ व्या शतकात सम्राट भोज यांनी त्यांच्या कार्यकाळात मध्यप्रदेशातील धार येथे ‘भोजशाळा’ हे ‘वाग्देवीचे, म्हणजे विद्येचे ज्ञानकेंद्र’ उभारले; परंतु अनेक दशकांपासून भोजराजाद्वारे स्थापित श्री सरस्वतीदेवीच्या या मंदिरावर मुसलमानांनी अतिक्रमण केले होते.

कु. रजनीगंधा कुर्‍हे

त्यांनी या जागेला ‘कमाल मौला मशीद’ असे नाव दिले आणि तेथे प्रतिदिन नमाजपठण चालू केले. जागृत आणि धर्मप्रेमी हिंदूंच्या ९०० वर्षांच्या अथक संघर्षानंतर १५.५.२०२६ या दिवशी या संघर्षाला देवी सरस्वतीच्या कृपेने यश मिळाले. धार येथील भोजशाळा हे हिंदूंचे वाग्देवी मंदिर आणि संस्कृत अध्ययनाचे केंद्र असल्याने यापुढे तेथे नमाजपठण होणार नसल्याचा आदेश मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठाने दिला. याविषयीचे वृत्त १६.५.२०२६ ला प्रसिद्ध झाले आणि १७.५.२०२६ या दिवशी मुंबई येथे श्री राजमातंगीदेवीचा महायज्ञ पार पडला.

श्री राजमातंगीदेवी ही श्री सरस्वतीदेवीच्या तांत्रिक उपासनेचे रूप आहे. यावरून ‘भोजशाळा नमाजमुक्त होणे आणि श्री राजमातंगीदेवीचा यज्ञ होणे’, हे केवळ संयोग नसून दैवी संकेत आहेत. आता ‘श्री राजमातंगीदेवीचे तत्त्व पूर्ण रूपात कार्यरत झाले आहे’, असे जाणवत असून त्यामुळे ‘भारत आता विश्वगुरु पदावर पुन्हा जलद गतीने आरूढ होण्यास साहाय्य होईल’, असे मला वाटले.’

– कु. रजनीगंधा कुर्‍हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक