‘श्री. प्रताप वंका (प्रतापदादा) हे भाग्यनगर (तेलंगाणा) येथील असून काही वर्षांपासून ते रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील अन्नपूर्णाकक्षात (स्वयंपाकघरात) सेवा करत आहेत. श्री. प्रताप वंका यांच्या सहवासात असतांना मला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. शांत आणि मितभाषी स्वभाव
श्री. प्रतापदादा अन्नपूर्णाकक्षात सेवा करत असतांना सेवेविषयी आवश्यक तेवढेच बोलतात. ‘आपली सेवा परिपूर्ण कशी होईल ?’, याकडेच त्यांचे लक्ष असते. ते निवासाच्या ठिकाणीही हळू आवाजात आणि आवश्यक तेवढेच बोलतात.
२. सतत सेवारत आणि आनंदी असणे
अन्नपूर्णाकक्षातील सेवेची व्याप्ती अन्य सेवांच्या तुलनेत मोठी आहे. प्रतापदादा सकाळी ६ वाजता सेवेला येतात. नंतर दुपारी थोडा वेळ विश्रांती घेऊन रात्री १० वाजेपर्यंत सेवा करतात. दिवसभरात १० घंट्यांहून अधिक वेळ ते सेवा करतात, तरीसुद्धा त्यांच्या चेहर्यावर कधी थकवा दिसून येत नाही. ते नेहमी आनंदी आणि शांत असतात.

३. इतरांचा विचार करणे
३ अ. साधकांना आवाजाचा त्रास होऊ नये, यासाठी रात्री खोलीबाहेर जाऊन भक्तीसत्संग ऐकणे : २३.४.२०२६ या दिवशी रात्रीच्या वेळी दादा हिंदी भाषेतील भक्तीसत्संग ऐकत होते. त्या वेळी आम्ही आमची सेवा संपवून खोलीत विश्रांती घेत होतो. तेव्हा आम्हा साधकांना आवाजाचा त्रास होऊ नये; म्हणून प्रतापदादा खोलीच्या बाहेर जाऊन भक्तीसत्संग ऐकत होते.
३ आ. खोलीतील साधकांना दिव्याच्या प्रकाशाचा त्रास होऊ नये; म्हणून जिन्याच्या पायरीवर बसून सारणीचे लिखाण करणे : प्रतापदादा प्रतिदिन सेवा आटोपून रात्री १० वाजल्यानंतर खोलीत झोपण्यासाठी येतात. तेव्हा आम्ही खोलीतील सर्व साधक विश्रांती घेत असल्याने आम्हाला प्रकाशाचा त्रास होऊ नये; म्हणून ते खोलीच्या बाहेर जिन्याच्या पायरीवर बसून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची सारणी लिहितात.
४. व्यष्टी साधनेचे गांभीर्य असणे
प्रतापदादांना रात्री झोपायला कितीही उशीर झाला, तरी ते प्रतिदिन सारणीलिखाण पूर्ण करूनच झोपतात. यातून त्यांचे व्यष्टी साधनेचे गांभीर्य दिसून येते. ते नामजपादी उपाय पूर्ण झाल्यावर अत्यंत शरणागतभावाने आत्मनिवेदन करून मगच विश्रांती घेतात.
५. श्री. प्रताप वंका यांच्यामुळे साधकाचे व्यष्टी साधनेचे गांभीर्य वाढणे
प्रतापदादांच्या प्रेरणेने मी प्रतिदिन स्वभावदोष आणि अहं निर्मूलन सारणी नियमितपणे अन् पूर्ण लिहिण्यास आरंभ केला. रात्री झोप येत नसतांना मी बसून नामजप करायला लागलो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मला प्रतापदादांमध्ये असलेले गुण लक्षात आले आणि गुरुदेवांमुळेच मला प्रतापदादांचा सहवास मिळाला. त्याबद्दल मी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. भुजंग चव्हाण, राजहंसगड, बेळगाव. (२८.४.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !