साधक नामजप करत असतांना त्याला भगवान शिवाच्या अस्तित्वाची आलेली अनुभूती

श्री. दत्तात्रय कुलकर्णी

‘१९.५.२०२६ या दिवशी दुपारी ४ वाजता मी घरी डोळे बंद करून ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत होतो. त्यानंतर १५ मिनिटांनी मला ‘सुईं’ असा आवाज ऐकू आला; म्हणून मी डोळे उघडले. तेव्हा मला सूक्ष्मातून दिसले, ‘माझ्या आसंदीसमोर पिवळ्या रंगाची नागदेवता फणा काढून बसली आहे. मी डोळे बंद करून नमस्काराच्या मुद्रेत बसलो आहे. माझा नामजप चालूच होता. तेवढ्यात एक साधिका पांढरी फुले घेऊन आल्या. त्यांनी गुलाबी छटा असलेली पांढरी साडी नेसली होती. मी थोडा वेळ डोळे उघडून पुन्हा नामजप करू लागलो.’ संध्याकाळी ५.३० वाजता नामजप पूर्ण झाल्यावर मी आसंदीवरून उठलो.

‘नागदेवता आणि त्यांना आवडणारी पांढरी फुले मिळणे’, हा काहीतरी योगायोग असावा’, असे मला वाटले. मी ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप प्रतिदिन करतो.

या घटनेविषयी सद्गुरु स्वाती खाडये यांना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘ही अनुभूती चांगली असून भगवान शिवाने त्याचे अस्तित्व असल्याची अनुभूती दिली.’’

‘गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मला ही अनुभूती आली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

एक याचक,

– श्री. दत्तात्रय कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८१ वर्षे), गावभाग, सांगली. (२०.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक