कोलकातामधील पंतप्रधान मोदी यांच्या २१ जूनच्या कार्यक्रमावर मुसलमानांकडून टीका
कोलकाता (बंगाल) – येत्या २१ जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकाता येथील रेड रोड येथील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत अनुमाने ३० सहस्र लोक योग करणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने रेड रोडसह शहरातील ७ प्रमुख रस्ते मध्यरात्रीपासून कार्यक्रम संपेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यास मुसलमानांकडून विरोध होत आहे.
बंगालमधील जलपाईगुडी मशिदीचे इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा) हाफीज महंमद नईमुद्दीन गाजी म्हणाले, ‘‘मी भारतीय नागरिक आहे आणि राज्यघटनेचे कलम १५ सर्व नागरिकांना समान अधिकार देते. जर वाहतुकीची समस्या सांगून रस्त्यावर नमाजपठण करणे बंद केले असतांना रेड रोडवर योग दिनाच्या कार्यक्रमाची अनुमती कशी देण्यात आली ? जर रस्ते बंद केल्याने लोकांना त्रास होतो, तर हा नियम सर्वांसाठी समान असावा.’’
"Public namaz gatherings have frequently caused significant traffic delays on Kolkata's roads, including Red Road, for years."
Minister Dilip Ghosh hits out at critics questioning road closures for the PM's security in Kolkata.
He emphasised that security cannot be compromised,… pic.twitter.com/IDQxVbjyDa
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 16, 2026
(म्हणे) ‘कायदा आणि नियम सर्व धर्मांसाठी समान असावेत !’
खातिम महंमद यांनीही प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, मुसलमान समाजाने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत रेड रोडवर नमाजपठण केले नाही; (म्हणजे ते प्रशासन आणि जनता यांच्यावर उपकार करत नाहीत, हे त्यांना सांगायला हवे ! – संपादक) पण आता योग दिनासाठी त्याच ठिकाणी मोठ्या आयोजनाला अनुमती दिली जात आहे. कायदा आणि नियम सर्व धर्मांसाठी समान असावेत. (देशात समान नागरी कायद्याला विरोध करणारे समान नियमांची मागणी करतात, हा विनोदच ! – संपादक)
पंतप्रधानांचा कार्यक्रम हा महत्त्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम ! – मंत्री दिलीप घोष
भाजपचे नेते आणि बंगाल सरकारमधील मंत्री दिलीप घोष म्हणाले की, अनेक वर्षे रेड रोडसह कोलकाताच्या अनेक रस्त्यांवर नमाजपठणामुळे बराच वेळ वाहतूककोंडी होत असे. पंतप्रधानांचा कार्यक्रम हा महत्त्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; म्हणूनच काही रस्ते काही घंट्यांसाठी बंद करणे आवश्यक आहे. यापूर्वी अनेक मशिदी उपलब्ध असतांनाही अनेक वर्षे रेड रोडवर नमाजपठण केले जात होते. आज मात्र पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पंतप्रधानांचा कार्यक्रम अशा ठिकाणी व्हायला हवा जिथे लोकांची ये-जा तुलनेने अल्प असेल. जर हे आयोजन एखाद्या मैदानावर झाले असते, तरीही सुरक्षेच्या कारणास्तव आजूबाजूचा परिसर बंद करावा लागला असता. जे काही होत आहे, ते जनहितार्थ आहे आणि प्रत्येकाने कायद्याच्या चौकटीत रहायला शिकले पाहिजे.

हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न