भारताच्या सीमावर्ती प्रदेशात स्थायिक होणार्या स्थलांतरितांमध्ये लोकसंख्याशास्त्रीय दबावांचा एक नवीन परिणाम गेल्या काही वर्षांत अधिकाधिक ठळकपणे दिसून येत आहे. आश्चर्याचे म्हणजे दैनंदिन जीवनशैलीमध्ये महत्त्वपूर्ण पालट दर्शवत आणि नागरी समाजाच्या मुळावरच परिणाम करत असूनही यांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाले आहे. या लोकसंख्याशास्त्रीय पालटांच्या अशा अनपेक्षित परिणामांचा आम्ही या अभ्यासात काही तपशिलात अभ्यास केला आहे. बांगलादेशातून होणारे प्रचंड स्थलांतर, धर्मनिरपेक्ष सलोखा, तसेच राष्ट्रीय सुरक्षा जपण्याच्या भारताच्या प्रयत्नांवर होणार्या नकारात्मक परिणामाचे विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न केला आहे.
लेखक: श्री. बिमल प्रमाणिक, संचालक, ‘सेंटर फॉर रिसर्च इन इंडो-बांगलादेश रिलेशन्स’, कोलकाता, बंगाल.

१. बांगलादेशींच्या स्थलांतराचा भारतावर झालेला घृणास्पद परिणाम

ईशान्य आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवर बांगलादेशी स्थलांतरितांच्या परिणामाचे मूल्यांकन करतांना आम्ही बांगलादेशाच्या लष्करी क्षमतेचे अतिशयोक्तीपूर्ण मूल्यमापन करू इच्छित नाही. असे असले तरी धार्मिक कारणांवरून फाळणी होऊनही स्वातंत्र्यापासून भारत ज्या धर्मनिरपेक्ष सलोख्याच्या मूल्यांचे अविरतपणे पालन करत आहे, त्यावर होणार्या त्यांच्या विचलित करणार्या आणि विकृत करणार्या परिणामाचे महत्त्व आम्ही न्यून लेखू शकत नाही. बांगलादेशी स्थलांतराचा भारतावरील हा घृणास्पद परिणाम, म्हणजे एक धर्मनिरपेक्ष बहुसांस्कृतिक राज्य म्हणून विकसित होण्यात बांगलादेशाच्या झालेल्या घोर अपयशाचाच एक तार्किक परिणाम आहे.
२. बांगलादेशातील सत्ताधार्यांकडून पूर्व आणि ईशान्य भारतात फुटीरतावादी शक्तींना भडकावण्यासाठी इस्लामचा वापर
सध्याच्या बांगलादेशातील सत्ताधारी वर्तुळ केवळ बांगलादेशाचे इस्लामीकरण व्यापक आणि सखोल करण्यासाठीच नव्हे, तर आवश्यकता पडल्यास दीर्घकाळ चालणार्या सशस्त्र संघर्षाला व्यापक पाठिंबा देऊन पूर्व अन् ईशान्य भारतातील फुटीरतावादी किंवा विभाजनवादी शक्तींना भडकवण्यासाठी इस्लामचा वापर करण्यासही कटीबद्ध आहे. हे एक उघड गुपित आहे की, बांगलादेशात अनेक आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटना, ज्यांचा अजेंडा (कार्यसूची) आक्रमक मूलतत्त्ववादी आहेत, इस्लामच्या उदारमतवादी तत्त्वांच्या किंमतीवर बांगलादेशाच्या सामाजिक-सांस्कृतिक जडणघडणीला नवीन इस्लामी रचनेनेे झाकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
३. भारतात वसाहत निर्माण करण्यासाठी बांगलादेशाकडून स्थलांतरितांना पाठवणे हा प्रभावी मार्ग
आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला आणि सामाजिक सलोख्याला असलेला हा धोका, जोपर्यंत आपण या संदर्भात बांगलादेशाच्या भूमिकेचे विश्लेषण करत नाही, तोपर्यंत स्पष्टपणे समजणार नाही. फाळणीच्या दिवसांपासून पाकिस्तानच्या दोन्ही भागांतील मुसलमानांची मानसिकता बंगाल आणि आसामचा अर्धा भाग गमावल्याच्या दुःखाने ग्रासलेली आहे. फाळणीच्या दिवसांपासून ते निर्दयपणे ‘लेबेन्सराउम’ (lebensraum) (मूळ जर्मन शब्द ज्याचा अर्थ रहाण्याची जागा असा होतो) या धोरणाचा पाठपुरावा करत आहेत. कदाचित् १६ व्या शतकात महान इटालियन विचारवंत मॅकियाव्हेलीने केलेल्या निरीक्षणाच्या तत्त्वज्ञानानुसार ते वागत असावेत. मॅकियाव्हेलीने म्हटले होते, ‘देशांवर वसाहत करण्यासाठी स्थलांतरितांना पाठवणे, हा सर्वांत प्रभावी मार्ग आहे; कारण लष्करी मोहिमा पाठवण्यापेक्षा तो अल्प त्रासदायक आणि पुष्कळच अल्प खर्चिक आहे.’ बांगलादेश एकाग्र निष्ठेने या धोरणाचा पाठपुरावा करत आहे आणि किमान एवढे तरी म्हणता येईल की, या प्रयत्नांत तो बर्यापैकी यशस्वीही झाला आहे.

४. वाढत्या लोकसंख्येचा दबाव आणि भीषण गरिबी यांमुळे बांगलादेशाकडून स्थलांतराला प्रोत्साहन
बांगलादेशातील वाढता लोकसंख्येचा दबाव आणि ग्रामीण भागातील उपेक्षित जनतेची भीषण गरिबी अन् दरिद्रीपणाने त्यांना स्थलांतराच्या या ‘अजेंड्या’ला जीवन-मरणाचा प्रश्न मानण्यास प्रोत्साहित केले, किंबहुना भागच पाडले, ज्याला कुणीही विरोध करू शकत नाही. याच कालावधीत इस्लामी शक्तींचे एकत्रीकरण आधीच प्रगत झाले होते. त्यांनी एक भव्य राजकीय रणनीती म्हणून ‘विस्तृत इस्लामी प्रदेशा’चा अजेंडा स्वीकारला. जरी हे शेख मुजीबर यांच्यासाठी एक भावनिक सूत्र होते, तरी नंतर पाकिस्तानच्या पाठिंब्याने ते एक राजकीय अन् सामरिक सूत्र बनले.
५. बांगलादेशाच्या उदयामुळे भारताच्या ईशान्य राज्यांमध्ये इस्लामीकरणासाठी निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती
वर्ष १९८० च्या दशकात बांगलादेशातून होणारे नियोजित स्थलांतर ‘लेबेन्सराउम’ सिद्धांतानुसार होते, ज्याला भारताच्या पूर्व आणि ईशान्य भागातील काही राजकीय अन् सामाजिक शक्तींच्या संरक्षणाखाली, तसेच आश्रयाखाली सीमावर्ती राज्यांमधील भारतीय मुसलमानांनी प्रोत्साहन दिले होते. सीमेपलीकडून होणारी ही सततची घुसखोरी सीमावर्ती भागांमधील, विशेषतः बंगाल आणि आसाम या राज्यांमधील लोकसंख्याशास्त्रीय रचनेत हळूहळू अन् सातत्याने पालट घडवत आहे. ही पालटलेली लोकसंख्याशास्त्रीय परिस्थिती सामाजिक सलोखा बिघडवण्यास सहज वाव देते. या प्रदेशात यामुळे आधीच लोकसंख्याशास्त्रीय आक्रमणाचे स्वरूप धारण केले आहे, जे धर्मनिरपेक्ष शासनप्रणाली आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करत आहे. ही एक धार्मिक-सांस्कृतिक प्रक्रिया आहे जी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणार्या भौगोलिक प्रदेशात घडत आहे. अशा प्रकारे बांगलादेशाच्या उदयाने भारताच्या ईशान्य राज्यांमध्ये इस्लामीकरणासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली आहे.
६. भारतात इस्लामीकरणाच्या प्रक्रियेला चालना देणारे महत्त्वाचे ३ घटक
इस्लामीकरणाच्या प्रक्रियेला चालना देणारे किमान ३ घटक स्पष्ट आहेत.
अ. पहिले म्हणजे आश्चर्यकारकपणे, ईशान्य आणि पूर्व भारताच्या या भागांमध्ये जे काही इस्लामीकरण झाले आहे, ते एका धर्मनिरपेक्ष राजकीय वातावरणात घडले आहे.
आ. दुसरे म्हणजे मते मिळवण्याच्या उद्देशाने परकियांचे लांगूलचालन आणि सातत्यपूर्ण केंद्रविरोधी भूमिका यांमुळे इस्लामीकरणाच्या मानसिकतेच्या विस्तारास पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
इ. तिसरे म्हणजे एक कमकुवत, अस्पष्ट आणि असंघटित धर्मनिरपेक्ष चौकट इस्लामीकरणाच्या प्रक्रियेचा सामना करण्यास अयशस्वी ठरली आहे.
– बिमल प्रमाणिक, संचालक, ‘सेंटर फॉर रिसर्च इन इंडो-बांगलादेश रिलेशन्स’, कोलकाता, बंगाल. (८.६.२०२६)
आक्रमणाचा परिणाम भारत-अमेरिका संबंधांवरही होऊ शकतो !
जेवढे रुपये कमवण्यासाठी आर्यभट्ट यांचा अवमान केला, तेवढे भारत सरकारने दंड म्हणून वसूल करावेत !
आज सोमवती अमावास्या !
प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमा’विषयी देवस्थानांच्या शासनाकडून अपेक्षा !
नाव पर्यावरणाचे, उद्दिष्ट भारतविरोधाचे… !
समाजासाठी साधूसंतांचे योगदान आणि त्यांच्यावरील आघात !