बारुईपूर (बंगाल) येथील शाळेतील घटना
क्षमा मागण्यास केले बाध्य
मुसलमान विद्यार्थ्यांवर कारवाई करू ! - बंगालच्या शिक्षणाधिकार्यांचे आश्वासन

कोलकाता (बंगाल) – राज्यातील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात असलेल्या बारुईपूर शहराची ही घटना. येथील एका शाळेत दहावीतील एका हिंदु विद्यार्थ्याने ‘जय श्रीराम’ ही घोषणा दिल्यावरून त्याच्याच मुसलमान वर्गमित्रांनी शाळेच्या आवारात त्याला अमानुष मारहाण केली. ४ जूनला ‘मदारत पॉप्युलर अकॅडमी’मध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर १० जूनला शाळेच्या परिसरात हिंदूंचे तीव्र आंदोलन झाले.
⚠️ "Punished for Saying 'Jai Shri Ram'?"
🚨 Baruipur, Bengal: A Hindu student was assaulted by Mu$lim classmates and forced to apologise for chanting "Jai Shri Ram."
The victim claims school authorities were informed but failed to act.
Following public outrage and protests,… pic.twitter.com/M64SYE9U3A
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 12, 2026
मिळालेल्या माहितीनुसार देबाजीथ हलदार या पीडित विद्यार्थ्याला १० ते १२ मुसलमान विद्यार्थ्यांच्या गटाने शाळेच्या स्वच्छतागृहात ओढून नेले.
देबाजीथ म्हणाला की,
१. आक्रमणकर्त्यांनी मला चुकीने दुसराच विद्यार्थी समजले. ज्या मुलाने वर्गात ‘जय श्रीराम’ची घोषणा दिली होती, त्याच्याशी माझे साम्य होते.
२. मला स्वच्छतागृहात कोंडूनही ठेवण्यात आले होते. मी सांगण्याचा प्रयत्न केला की, मी तो मुलगा नाही, तरी माझे काहीएक ऐकून न घेता मला क्षमा मागण्यास भाग पाडण्यात आले.
३. एका बाजूला काही जण मला मारत होते आणि काही जण व्हिडिओ बनवत होते.
४. मी माझ्या शिक्षकांनाही या घटनेविषयी माहिती दिली होती; परंतु त्यांनी काहीही केले नाही.
देबाजीथच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली व्यथा !
देबाजीथच्या शरिराच्या अनेक भागांवर, विशेषतः कानाला दुखापत झाली असून त्याला ऐकण्यासही त्रास होत आहे. त्याला अनेकदा डॉक्टरांकडे नेण्यात आले आहे आणि तो मानसिक धक्क्यातून जात आहे. भीतीमुळे त्याने शाळेत जाणे बंद केले आहे. बारुईपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अधिकृत तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.
१० जूनला मारहाणीचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर अनेक हिंदु संघटना आणि भाजपचे समर्थक शाळेबाहेर मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी आरोपी विद्यार्थ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. या वेळी आंदोलकांनी रस्ता रोखून धरला होता. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि विद्यार्थी शाळेच्या आवारात अडकून पडले. संतप्त आंदोलकांनी आक्रमणकर्त्यांपैकी काहींना मारहाण केल्याचेही समजते.
शाळा व्यवस्थापनाने मुसलमान विद्यार्थ्यांना निलंबित करण्याची उच्चाधिकार्यांकडे केली शिफारस !
यासंदर्भात ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने दक्षिण २४ परगणा जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पिनाकी दत्ता यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या प्रकरणी आम्ही कोणती कारवाई केलेली नाही. याचे कारण हे प्रकरण अल्पवयीन मुलांशी जोडलेले आहे. शाळा व्यवस्थापनच यासंदर्भात कारवाई करत आहे.
शाळेचे मुख्याध्यापक सैकत पुरकैत यांनी वरिष्ठ अधिकार्यांना पत्र लिहून आरोपी विद्यार्थ्यांना निलंबित करण्याची शिफारस केली आहे. यासंदर्भात पुरकैत यांनी पुढील कारवाई अद्याप झालेली नाही, अशी माहिती ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली. ते म्हणाले की, शाळा प्रशासनाने पीडित विद्यार्थ्याचे कुटुंब, आरोपी विद्यार्थ्यांचे पालक आणि पोलीस अधिकारी यांची बैठक बोलावली. बैठकीच्या वेळी आरोपींच्या कुटुंबियांनी क्षमा मागितली.
शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांना संपर्क साधला असता नाव न घेण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, मुसलमान विद्यार्थ्यांच्या विरोधात योग्य कारवाई केली जाईल.
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी