जग अस्थिर; पण भारत आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करत आहे ! : PM Narendra Modi

नीती आयोगाची ११ वी बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – जागतिक अनिश्चितता आणि अस्थिरता यांच्या काळातही भारत आत्मविश्वासाने अन् दृढ निश्चयाने विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या ११ व्या बैठकीत ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ‘विकसित भारत’चे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्ये यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. भारताने अनेक देशांसमवेत मुक्त व्यापार करार केल्यामुळे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना जागतिक बाजारपेठेत संधी उपलब्ध होत आहे. या वेळी पंतप्रधानांनी युवक आणि महिला यांचे सक्षमीकरण हे विकसित भारताचे प्रमुख आधारस्तंभ असल्याचे सांगून दर्जेदार शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार-निर्मिती यांच्या आवश्यकतेवरही भर दिला.