निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रसादालय चालू करावे - भाविकांची मागणी
दर्शनासाठी येणार्या भाविकांना अडचणी
हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण केल्याचे दुष्परिणाम !

नेवासा (जिल्हा अहिल्यानगर) – प्रसिद्ध शनिशिंगणापूर येथील ‘शनैश्वर देवस्थान’ समितीवर प्रशासक नेमले आहेत. देवस्थानाकडून चालवले जाणारे ‘प्रसादालय’ गेल्या ९ महिन्यांपासून बंद आहे. या ठिकाणी शनि दर्शनासाठी येणार्या भाविकांना अल्प मूल्यामध्ये महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. हे महाप्रसादालय बंद असल्यामुळे येणार्या भाविकांना अडचणींना समोरे जावे लागत आहे. तरी प्रशासकांनी हे प्रसादालय त्वरित चालू करावे, अशी भाविकांची मागणी आहे.
१. देवस्थान समितीच्या वाहनतळाजवळ हे ‘प्रसादालय’ आहे. या प्रसादालयात प्रतिदिन २ ते २ सहस्र ५०० भाविकांना प्रसादाचा लाभ मिळतो.
२. या प्रसादालयासाठी अनेक उद्योजक आणि दानशूर व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात देणग्याही मिळतात.
३. नुकतेच ऑस्ट्रेलियातील उद्योजक माटा यांनी २ कोटी रुपये व्यय करून अत्याधुनिक स्वयंपाक यंत्रणा बसवून दिली आहे.
४. स्वयंपाकगृहातील दुरुस्तीसाठी ७ सप्टेंबर २०२५ पासून प्रसादालय बंद ठेवण्यात आले होते. ते ३० सप्टेंबरपासून चालू होणार होते; परंतु २२ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. ७ सप्टेंबर या दिवसापासून दुरुस्तीसाठी बंद करण्यात आलेले प्रसादालय अजूनही चालू झाले नाही.
५. कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी प्रसादालयाविषयी २४ एप्रिल या दिवशी वर्तमानपत्रामध्ये निविदा प्रसिद्ध केली होती. त्याची अजून तांत्रिक पडताळणी चालू असल्याचे चोरमारे यांनी सांगितले. (‘सरकारी काम आणि ६ महिने थांब !’, या म्हणीप्रमाणे प्रशासनाचे काम चालू असल्याचे हे उत्तम उदाहरण ! – संपादक)
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटकेत !
आपत्कालीन परिस्थितीसाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सिद्ध !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या वारीसाठी नवीन रथ
सोमवती अमावास्येच्या भाविकांसाठी सजला जेजुरीतील ‘श्री खंडोबा गड’ !
रिक्शाचालकाने मीटरपेक्षा अधिक भाडे आकारल्यास तक्रार करा ! – पुणे शहर वाहतूक शाखा
बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण निर्मूलन कारवाई !