नवी मुंबई – संभाव्य अतीवृष्टी आणि संततधार पावसामुळे उद्भवणार्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मान्सून कालावधीमध्ये आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन प्रशासन सिद्ध आहे, अशी माहिती परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगश कडुसकर यांनी दिली. आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने प्रवाशांनी परिवहनच्या बसगाड्यांतून प्रवास करतांना त्या मध्येच बंद पडल्या, काही नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास किंवा सेवाविषयक काही तक्रारी असल्यास उपक्रमाच्या १८००२२००४७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. ही सेवा २४ घंटे निःशुल्क कार्यान्वित आहे. ८३५६८३३५७० व ८३५६८३३५७१ या भ्रमणभाष क्रमांकावरही संपर्क साधावा.
तुर्भे आगार आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक ८३५६८३३५६६, आसुडगाव आगार आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक ८३५६८३३३९० व घणसोली आगार आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक ८३५६८३३५४५ हे आहेत. आपत्कालीन स्थितीत या क्रमांकावर सुध्दा संपर्क साधू शकतात, जेणेकरुन आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या अडी-अडचणी दूर करून अधिकाधिक सुरळीत आणि सुरक्षित सेवा देणे सोईस्कर होईल, असे आवाहन योगश कडुसकर यांनी केले आहे.

उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !