
पुणे – शहर वाहतूक शाखा आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्याकडून शहरात जनजागृती अभियान घेण्यात येत आहे. पुणे रेल्वेस्थानकावरून आपल्या इच्छित ठिकाणी जाण्यासाठी रिक्शातून जातांना रिक्शाचालक मीटरपेक्षा अधिक भाडे आकारत असल्यास किंवा जवळचे भाडे आहे; म्हणून नाकारल्यास त्या रिक्शाच्या वाहन क्रमांकाचे छायाचित्र काढून ८२७५३ ३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवून तक्रार करा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. (पोलिसांचा धाक नसल्याने असे आवाहन करण्याची वेळ येते ! – संपादक) तक्रार योग्य असल्यास रिक्शाचालकाचे परमिट आणि वाहन चालवण्याची अनुज्ञप्ती रहित करण्यात येईल, असेही वाहतूक शाखेने सांगितले आहे. वाहतूक शाखेने या संदर्भातील चलचित्र सामाजिक माध्यमावर प्रसारित केले आहे.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !