
गणेश नाईक, वनमंत्रीनवी मुंबई – शहरातील विजेचा लपंडाव आणि पाणी समस्या यांवर उपाययोजना काढण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वाशी येथे बैठक पार पडली. वनमंत्र्यांनी महावितरणच्या अधिकार्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देतांनाच पालिका अधिकार्यांना पाणी चोरांचाही शोध घेण्याचे आदेश दिले. या वेळी नवी मुंबईच्या महापौर, उपमहापौर, महापालिका आयुक्त, महावितरणचे अधीक्षक अभियंता आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
महावितरणकडे विजेची साधनसामग्री आणि दुरुस्तीसाठी केबल उपलब्ध नसतात, अशा तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या. यावर आवश्यक मनुष्यबळ आणि विजेची साधनसामुग्री उपलब्ध करून सुरळीत वीज पुरवठा करण्याची सूचना वनमंत्र्यांनी अधिकार्यांना केली. गुंडगिरी करून विजेच्या केबल घेऊन जाणार्या व्यक्तींविरोधात पोलिसात तक्रार करण्यासही त्यांनी सांगितले.
आवश्यकता भासल्यास महावितरणसाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
महावितरणचे अधीक्षक अभियंता पाटील यांनी वाढत्या उष्णतेमुळे नवी मुंबईमध्ये विजेच्या मागणीमध्ये ३० टक्के वृद्धी झाल्याची माहिती दिली. विशेष करून एलटी लाईन मध्ये वारंवार बिघाड होण्याच्या घटना वाढल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढण्याचे त्यांनी सांगितले. वीज कर्मचार्यांचे मनुष्यबळ वाढवण्यात आले आहे. त्याचबरोबर लवकरच नवी मुंबईसाठी दहा किलोमीटर केबल उपलब्ध होणार आहे. रबाळे येथील सब स्टेशन लवकरच चालू होणार असून त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त केला. वीज पुरवठा खंडित झाल्यावर नागरिकांच्या तक्रारीचे फोन महावितरणचे अधिकारी उचलत नाहीत अशा तक्रारी आहेत. त्यावर स्थानिक पातळीवरच तक्रार नोंदणी केंद्र चालू करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
शहरातील पाणी समस्येवर महापालिका अधिकार्यांना सूचना देताना मोरबे धरणाच्या जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी वाढल्याचे वनमंत्री नाईक म्हणाले. स्काडा प्रणालीतून पाणी चोरांचा शोध घेऊन पाणी चोरी थांबवण्याचे निर्देश त्यांनी दिले. बारवी धरणातून नवी मुंबईला देय असलेला २५ एमएलडी पाण्याचा साठा अद्याप मिळालेला नाही. तो लवकरात लवकर मिळवण्यासाठी महापालिकेच्या अधिकार्यांनी पाठपुरावा करण्याचे निर्देश नाईक यांनी बैठकीत दिले.
महापालिका अधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये शहरातील उड्डाणपुलाखालील भिकारी आणि उपद्रवी व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. नवी मुंबईतील ५० टक्के फेरीवाले हे बाहेरचे असून सर्वेक्षण करून या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर अतिक्रमण विरोधी कारवायांसाठी महापालिके करता लवकरच स्वतंत्र पोलीस पथक उपलब्ध होणार असल्याचेही गणेश नाईक यांनी सांगितले.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटकेत !
आपत्कालीन परिस्थितीसाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सिद्ध !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या वारीसाठी नवीन रथ
सोमवती अमावास्येच्या भाविकांसाठी सजला जेजुरीतील ‘श्री खंडोबा गड’ !
रिक्शाचालकाने मीटरपेक्षा अधिक भाडे आकारल्यास तक्रार करा ! – पुणे शहर वाहतूक शाखा
बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण निर्मूलन कारवाई !