
मुंबई – मुंबईतील आगामी गणेशोत्सव आणि इतर सण यांच्या कालावधीत समुद्रातील विसर्जन स्थळांवर भाविक, तसेच जीवरक्षक यांच्या सुरक्षिततेसाठी महानगरपालिकेने सिद्धता चालू केली आहे. विसर्जनाच्या वेळी समुद्रातील पाण्याचा अंदाज यावा आणि दुर्घटना टळाव्यात, यासाठी ओहोटीच्या रेषेवर ‘मरीन नॅव्हिगेशन बॉयज’ (समुद्री मार्गदर्शक तरंगते गोळे) आणि ‘सोलर लँटर्न’ (सौर कंदील) बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या यंत्रणेचा पुरवठा करणे, देखरेख ठेवणे आणि विसर्जन प्रक्रियेनंतर ती काढणे या ३ वर्षांच्या कंत्राटासाठी पालिकेच्या पर्यावरण आणि हवामान पालट विभागाने ऑनलाईन ई-निविदा मागवल्या आहेत.
चौपाट्यांवर रात्रीच्या किंवा भरती-ओहोटीच्या वेळी समुद्रातील पाणी आणि खोली यांचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडतात. समुद्रातील ‘मरीन नॅव्हिगेशन बॉयज’ हे विसर्जन कक्ष आणि ओहोटी यांच्या रेषेची अचूक सीमा दर्शवतील. त्यामुळे भाविकांना सुरक्षिततेची मर्यादित रेषा ओळखता येईल. त्यावर रात्री चमकणारे अत्याधुनिक सोलर दिवे बसवले जाणार आहेत. ते अंधारातही दिसू शकतात. आपत्कालीन परिस्थितीत जीवरक्षक आणि नौदलाच्या बोटी विसर्जन क्षेत्रात गस्त घालणार असल्याने अधिक सोपे होणार आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !