
कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय ‘क्रमांक २’च्या ‘अतिक्रमण निर्मूलन पथका’ने बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक, तसेच ताराबाई रस्ता परिसरात अनधिकृत फेरीवाले आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांविरोधात कारवाई केली. या कारवाईच्या वेळी लोखंडी हातगाड्या, लोखंडी जाळ्या, फलक, छत्र्या यासंह अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

ताराबाई रस्ता येथील महानगरपालिकेच्या बहुमजली वाहनतळ असलेल्या गाळेधारकांना पूर्वी वाटप करण्यात आलेल्या गाळ्यांमधील जागा रिकाम्या करण्याविषयी वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांची कार्यवाही न झाल्याने ही कारवाई करण्यात आली.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटकेत !
आपत्कालीन परिस्थितीसाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सिद्ध !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या वारीसाठी नवीन रथ
सोमवती अमावास्येच्या भाविकांसाठी सजला जेजुरीतील ‘श्री खंडोबा गड’ !
रिक्शाचालकाने मीटरपेक्षा अधिक भाडे आकारल्यास तक्रार करा ! – पुणे शहर वाहतूक शाखा
गणेशोत्सवापूर्वी मुंबई महापालिकेकडून विसर्जन स्थळांवर सिद्धता चालू !