
पुणे – मुंबई-पुण्याचे महापौर कार्यालय आणि नागपूरमधील रा. स्व. संघ मुख्यालय बॉंबने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. तसेच कर्णावती (अहमदाबाद) आणि गांधीनगर येथे १० जून ते २० सप्टेंबर या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बाँबस्फोट घडवण्याच्या गंभीर धमकीचे ई-मेल मिळाले आहेत. ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’च्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून कसून अन्वेषण चालू असून संवेदनशील भागांत सुरक्षा कडक करण्यात आली आहे. या धमकीच्या ई-मेलमध्ये केवळ मुंबई-पुणे महापौर कार्यालयच नव्हे, तर नागपूरमधील काही संवेदनशील ठिकाणे लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. यात आयईडी बाँबस्फोटाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून हा घातपात घडवून आणण्यासाठी काही विशिष्ट वेळा आणि दिनांक यांचाही संशयास्पद संदर्भ या ई-मेलमध्ये देण्यात आला आहे. (भारताचे तुकडे करू पहाणार्या देशविघातक शक्ती अजूनही देशात सक्रीय आहेत आणि त्यांचे धागेदोरे कुठे-कुठे पसरले आहेत, हेच यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते. अशा धमक्या देण्याचे धाडस कुणाचे होणार नाही, अशी जरब बसवणे आता आवश्यक आहे. – संपादक)
‘ऑपरेशन ब्लू स्टार’चा सूड घेण्याची धमकीवर्ष १९८४ मधील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ आणि ‘ऑपरेशन वूडरोझ’ला संघ अन् भाजप यांनी पाठिंबा दिला होता, ज्यामध्ये २० सहस्र शीख तरुण मारले गेल्याचा दावा यात करण्यात आला आहे. या घटनेचा सूड घेण्यासाठी संघ आणि भाजप संपवण्याची भाषा या ई-मेलमध्ये वापरण्यात आली असून हिंदूंनी स्वत:च्या मुलांना वाचवावे, असा थेट धमकीवजा संदेशही देण्यात आला आहे. या अत्यंत संवेदनशील ई-मेलच्या शेवटी इंजि. गुरनाख सिंह, रुकन शाहवाला, डॉ. गुरनीर्वैर सिंह आणि खान राजाडा अशा ४ व्यक्तींच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. |
भारतीय स्टेट बँकेला ३ वर्षांत ६ अब्ज ३१३ कोटी रुपयांचा फटका !
पिंपरी-चिंचवड येथे पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी ५०० जणांविरुद्ध गुन्हा नोंद, २ धर्मांधांना अटक !
आदिवासी कि वनवासी ?
मुसलमानांचे लांगूलचालन का केले जात आहे ? – गोरक्षक शिवशंकर स्वामी
५०० कोटी रुपयांच्या निधीतून सिद्धिविनायक मंदिराचे होणार सुशोभीकरण ! – सदा सरवणकर, अध्यक्ष, श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास
योगी आदित्यनाथ सरकार ‘तिहेरी तलाक’च्या पीडितांना देणार घरे आणि आरोग्य सुविधा !