
न्यूयॉर्क – पृथ्वीपासून अनुमाने ४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानका’चा अर्थात् ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’चा (आय.एस्.एस्.चा) कार्यकाळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. वर्ष २०२८ ते २०३० या काळात या स्थानकाला सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्याची योजना अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने घोषित केली आहे.
१. या मोहिमेसाठी नासाने १ अब्ज डॉलर्स (अनुमाने ९ सहस्र ५०० कोटी रुपये) खर्चाची योजना सिद्ध केली आहे. गेल्या २५ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे सर्वांत मोठी अंतराळ प्रयोगशाळा म्हणून कार्यरत आहे.
२. आय.एस्.एस्.चा नियोजित कार्यकाळ पूर्ण झाला आहे. तरीही त्याचा कालावधी अनेकदा वाढवण्यात आला होता. अलीकडच्या काळात या स्थानकाला सतत तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत असून त्याच्या सुरक्षेसाठी अब्जावधी डॉलर्सचा खर्च येत आहे.
३. आता नासाचा चंद्र आणि मंगळ मोहिमांवर केंद्रित करण्याचा मानस आहे. त्यामुळे आय.एस्.एस्.ला सन्मानपूर्वक आणि सुरक्षितपणे निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
४. एका विशेष अंतराळयानाचा वापर करून आय.एस्.एस्.ला नियंत्रित पद्धतीने पृथ्वीच्या वातावरणात ढकलले जाईल. वातावरणात प्रवेश केल्यावर घर्षणामुळे स्थानकाचा बहुतांश भाग जळून खाक होईल आणि त्याचे तुकडे होतील.
५. त्याचे मोठे अवशेष पृथ्वीवरील मानवी वस्ती असलेल्या भागांवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही; म्हणूनच नासाने पॅसिफिक महासागरातील एका दुर्गम भागाची, जो भूमीपासून पुष्कळ दूर आहे, त्याची निवड केली आहे, जेणेकरून वातावरणात प्रवेश केल्यानंतर उरलेले अवशेष या निर्जन सागरी भागातच पडतील.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan