इरशादने हिंदु महिलेचे अपहरण करून तिला सीरियाला नेण्याची दिली धमकी !

  • लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात

  • धर्मांतरासाठी आणला दबाव !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील पीजीआय परिसरात ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण समोर आले आहे. येथील इरशाद अली नावाच्या मुसलमानाने एका हिदु तरुणीचे अपहरण केले. त्याने तिला सीरियाला नेण्याची धमकी दिली. तसेच त्याने तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. ‘एस्.जी.पी.जी.आय.’ निवासी संकुलात रहाणार्‍या एका कुटुंबाने त्यांची २१ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याविषयी पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.

१. पीडित हिंदु तरुणी २१ मे या दिवशी कामाच्या निमित्ताने तेलीबाग येथे गेली होती; परंतु घरी परतली नाही.

२. तरुणीच्या कुटुंबाने इरशाद अली नावाच्या मुसलमान तरुणावर आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप केला आहे. इरशादची त्या कुटुंबाशी आधीपासून ओळख होती आणि तो त्यांच्या घरी येत-जात असे, असे त्यांनी सांगितले.

३. कुटुंबाचा आरोप आहे की, इरशादने त्यांच्या मुलीचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने तिला जाळ्यात अडकवले आणि तिला त्रास देण्यास चालू केले.

४. आरोपीने पीडित तरुणीची अश्लील छायाचित्रे बनवली होती आणि तिने विरोध केल्यास तिला सीरियाला पाठवण्याची धमकी देत असे.

५. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून तरुणीचा शोध चालू केला आहे.

जुबेरने ओळख लपवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : कलमा आणि नमाजपठण करण्यासाठी टाकला दबाव !

लक्ष्मणपुरीच्या पारा परिसरात ‘लव्ह जिहाद’चे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. जुबेर अन्सारी नावाच्या मुसलमान तरुणाने त्याची खरी ओळख लपवून एका हिदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर लग्नाचे आमीष दाखवून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवून तो तिला धमकावू लागला. तसेच त्याने  तिची आर्थिक पिळवणूकही केली. तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तिला कलमा म्हणण्यासाठी आणि नमाजपठण करण्यासाठी बलपूर्वक भाग पाडण्यात आले. पीडित तरुणीने जुबेर अन्सारी आणि त्याच्या कुटुंबातील काही सदस्य यांच्याविरुद्ध  पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायदा अस्तित्वात असूनही धर्मांधांना त्याचा जराही भय नाही, हेच यातून दिसून येते. धर्मांधांवर वचक निर्माण होईल, असे कायदे बनवणे आवश्यक !