श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेची सांगता !

सांगता पूजेच्या वेळी मंदिर समितीचे सदस्य श्री. संभाजी शिंदे, सदस्या शकुंतला नडगिरे, लेखा अधिकारी श्री. मुकेश अनेचा, व्यवस्थापक श्री. प्रवीणकुमार घम, तसेच इतर अधिकारी

पंढरपूर – उन्हाळ्यात श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणीमाता यांना शीतलता लाभावी, या उद्देशाने गुढीपाडव्यापासून आरंभ झालेल्या चंदनउटी पूजेची ९ जून या दिवशी सांगता झाली. मंदिरे समितीचे सदस्य आणि अधिकारी यांच्या हस्ते सांगता पूजा पार पडली, अशी माहिती व्यवस्थापक श्री. प्रवीणकुमार घम यांनी दिली. प्रतिवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राच्या प्रारंभापर्यंत श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणीमाता यांना चंदनउटी लावण्याची परंपरा आहे. या वेळी ही पूजा नियमानुसार करण्यात आली. या पूजेच्या माध्यमातून मंदिरे समितीला अनुमाने १४ लाख ६४ सहस्र रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.