छत्रपती संभाजीनगरमधील कथित धर्मांतर प्रकरणावरून शिवसेना प्रवक्ते आक्रमक !

छत्रपती संभाजीनगर – ‘नाशिक येथील ‘निदा खान प्रकरण’ हे केवळ एका शहरापुरते मर्यादित नसून त्याचे धागेदोरे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहेत, हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे. आता त्याचा प्रत्यय येत आहे’, असे परखड मत शिवसेना प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले. राज्यातील बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीवर चिंता व्यक्त करतांना ते म्हणाले की, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही अशी गंभीर प्रकरणे उघडकीस येत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पहावे. छत्रपती संभाजीनगर येथील धर्मांतरासारख्या घटनांना आवर न घातल्यास भविष्यात २ समाजांत तीव्र तेढ निर्माण होऊ शकते. शहरातून अनेक महिला अचानक बेपत्ता झाल्या असून यामागे षड्यंत्र आहे का ? याचे पोलिसांनी गांभीर्याने अन्वेषण करावे.
श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराला दीड किलो सोन्याचा कळस गोव्यातील भाविकाकडून दान
५ रुपयांच्या नोटांसह २० रुपयांची नाणी हे कायदेशीर चलन स्वीकारा ! – जिल्हाधिकारी
थोडक्यात महत्त्वाचे : ११.०६.२०२६
संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज ! – डॉ. मैनाक घोष, जिल्हाधिकारी
बीड येथे १० सहस्र रुपयांची लाच घेणार्या पोलीस हवालदाराला अटक !
बीड येथे जहाज उलटले; प्रवासी सुरक्षित, एक मुलगा बेपत्ता !