
बीड – अपघातग्रस्त व्यक्तीला वाहन आणि इतर विमा मिळण्यासाठी आवश्यक असणारा पोलीस पंचनामा अन् अन्य कागदपत्रांच्या प्रती हव्या होत्या. त्या देण्यासाठी १० सहस्र रुपयांची लाच घेणारा नेकनूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दत्तात्रय बळवंते याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (‘एसीबी’ने) नुकतीच अटक केली. जालना ‘एसीबी’च्या पथकाने नेकनूर पोलीस ठाण्याच्या आवारातच ही धडक कारवाई केली.
शेतकरी पुत्राला धमकी देणारा वादग्रस्त हवालदार !
लाचखोर हवालदार दत्तात्रय बळवंते हा आधीपासूनच अत्यंत वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळखला जात होता. काही महिन्यांपूर्वी एका ऊर्जा आस्थापनाचे टॉवर बसत असतांना एका शेतकरीपुत्राने त्याला विरोध केला होता. त्या वेळी बळवंते याने आस्थापनाची अनधिकृत बाजू घेत त्या शेतकर्याच्या मुलाला अत्यंत हीन दर्जाची धमकी दिली होती. त्या युवकाने आपण ‘यू.पी.एस्.सी.’ची मुख्य परीक्षा दिल्याचे सांगताच बळवंते याने मुजोरी करत, “मला काही सांगू नको, गुन्हा नोंदवून तुझे कॅरेक्टर (चारित्र्य) खराब करीन, बेट्या !” अशी धमकी दिली होती. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रचंड प्रसारित झाला होता.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर